पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१८ )

कर्तबगार व करारी, पण तितकाच नेहमीचा दुदैवी राज्यकर्ता राजे प्रताप- सिंह हा इ. सन १७६३ च्या दिजंबर महिन्यांत दैवगतीस पावला. राजे प्रतापसिंह हा मोठा दयाळू, औदार्यशाली व धर्मनिष्ठ असून, त्यानें धाम- धुमीच्या काळाशी टक्कर देत राहूनही उत्तम प्रकारें प्रजापालन करून मोठी कीर्ति मिळविली. कुंभकोणम्ऋ व चिदंबरम्+ येथील देवालयाचा जीर्णोद्धार केला व कुंभकोणम्, शिवेलर, मदुरा, रामेश्वर आणि त्रिणोमाली येथे मोठ- मोठे राजवाडे बांधिले राजा प्रतापसिंह यांस पांच स्त्रिया होत्या. त्यापैकी त्याची तिसरी स्त्री यमुनाबाई व पांचवी स्त्रो सखवारबाई त्या त्याच्याबरोबर सती गेल्या. प्रतापसिंहास तुळाजी ऊर्फ तुळजाराजे व अमरसिंह असे दोन पुत्र होते. त्यापैकी तुळाजी हा त्याच्यामागून तंजावरच्या गादीचा अधि- पती झाला.

 राजे तुळाजी याची कारकीर्द अजमार्से चोवीस वर्षांची ( इ. सन १७८७ पर्यंतची ) आहे. पण हा राज्यकर्ता तर प्रतापसिंहाहूनही दुर्दैवी होता, असे निदर्शनास येत आहे. ह्या दुर्दैवी राज्यकर्त्याच्या कारकीर्दीतही अर्काटचा नबाब महंमदअल्लो, मद्रासकर इंग्रज, आणि म्हैसूरचा हैदरअल्लो इत्यादि सत्ताभिलाषी व स्वार्थपटु मंडळींनी तंजावरच्या राज्यावर दृष्टी ठेवून ते इस्त- गत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यामुळे, तुळाजीची सर्व कारकीर्द या शिरजोर व बलिष्ठ लोकांच्या राजकारस्थानांचा प्रतिकार करण्यांत, व त्यांच्या पासून आपला बचाव करण्यांतच, त्यास खर्चा घालावी लागली.

 प्रतापसिंह मृत्यू पावला, व तुळाजी हा नुकताच गादीवर आला, असे पाहून तंजावरकराचा मुख्य शत्रू जो महंमदअल्ली त्यानें जुनें खंडणांचे भांडण पुन्हा उकरून काढले. प्रसिद्ध मेलूरच्या कालव्याचें धरण हे जरी तंजावरच्या राजाच्या मालकांचें होतें, तरी तें नबाबाच्या राज्याच्या हद्दीत होते. त्यामुळे


 *कुंमकोणम् हे तंजावर जिल्ह्यांत, तंजावर पासून २४ मैलांवर असून "तें एक रेलवे स्टेशन व तहशिलांचे ठिकाण आहे.

 + चिदंबरम् हें दक्षिण अर्काट जिल्ह्यांत कडलूरच्या दक्षिणेस २५ मैलांवर असून, तें एक रेलवे स्टेशन, व तालुक्याचे ठिकाण आहे.