पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३०८ )

पक्षीं ज्याअर्थी या दोन्ही कंपन्यांना (इंग्रज व फ्रेंच कंपन्यांना ) आपाआ- पल सैन्ये एकमेकांविरुद्ध अजून उपयोगात आणतां येणें शक्य नव्हतें, त्याअर्थी मोहिमेच्या मोठ्या फायद्याच्या आशेनें व्यापाराचे विशिष्ट हक्क अगर मुलूखद्दी मिळविण्याच्या हेतूनें, आणि संधी साघल्यास आपल्या प्रतिस्पर्ध्याचें कांहीसे जबर नुकसान करण्याच्या इरयानें आपआपल्या फौजा, त्यांचा तनखा भागवून एतद्देशीय राजेरजवाड्यांनी आपल्या नौकरीस ठेवाव्या, अशा अटीं करण्यास त्या दोन्हींही कंपन्यांना अनिवार मोह पडूं लागला; आणि हेंही कबूल केले पाहिजे की, या मोहास जर पहिल्यानें कोणी बळी पडले असेल, तर ती ही इंग्लिश कंपनीच होय. कारण त्याचवेळेस तंजावरच्या मराठा राजघराण्यातील राज्यकर्त्याला त्याच्या भावानें राज्यावरून पदच्युत करून आपण तेथील राजगादी बळकाविली होती. व त्याच राजाचा पक्ष इंग्रजांनी प्रथम घेतला होता. परंतु त्याला पुन्हां गादीवर बसविण्याकरितां जी मोहिम पाठविण्यांत आली होती, तिनें तें काम इतक्या अव्यवस्थित रीतीनें केले की, लढाईच्या बाबतींत झालेला खर्च आणि जमीनीचा एक लहानसा तुकडा एवढ्यावरच इंग्लिश कंपनीला संतुष्ट होऊन आपली फौज परत आणविणे भाग पडलें. हें फक्त लष्करी अपयशच नव्हे, तर राजकारणांतीलही ही एक घोडचूक होती. कारण ह्या तंजावर प्रकरणांतील इंग्रजांच्या मध्यस्थीनें डुले याला एतद्देशीय राजेरजवाड्याच्या भांडणांत भाग घेण्याला एक उत्तम दाखदाच मिळाला, आणि तोही अशा वेळी कीं, जेव्हां डुप्ले हा, अशाच प्रकारचे अत्यंत मह त्वाचे आणि दूरदर्शी स्वरूपाचे डावपेंच शोधून काढण्यांत गर्क झाला होता, व दक्षिण हिंदुस्थानामध्ये राजतख्त मिळविण्याचा राजरोस प्रश्न तरवारीनें सोडविण्याकरितां जे पदाभिलाषी लोक तयार झालेले होते. त्यामध्ये मनग- टाच्या जोरावर मध्यस्थी करून फ्रान्सचें वर्चस्व कायमचे प्रस्थापित करण्याचे बेत वाढीस लावण्याची त्याची ह्यावेळी पूर्ण तयारी झालेली होती." थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या मदतीस आपल्या फोजा देण्याचा प्रघात इंग्रजांनी जो प्रथम सुरू केला, तो या तंजावरच्या राज्यापासूनच सुरूं केला होता, हे उघड होतें.

 चंदासाहेब हा मराठ्यांच्या प्रतिबंधातून मुक्त झाल्याबरोबर अनेक ठिकाणी