पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०)

 मालोजीप्रमाणेच विठोजी यांसही निजामशाही सैन्यांत शिलेदारी मिळाली होती. विठोजसि, संभाजी, खेलोजी, मालोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्रिंबकजी, व मकाजी, असे आठ मुलगे होते; त्यापैकी खेळोजीचे वंशज कळस, निरगुडी, व शंभू महादेव येथे, मालोजांचे मुंगी पैठण येथें, मंबाजी व त्रिंबकजी यांचें तंजावर येथे, नागोजीचें बनशेंद्रे येथें, परसोजीचें नगर


पराक्रमी होते, व त्यांनीं वर्णगपाळ निंबाळकर यानें केलेल्या कोल्हापूरवरील स्वारीमध्ये अलौकिक मर्दुमकी गाजविली, असेंच सिद्ध होत आहे. या बखरीत असे लिहिलेलें आहे की, "निंबाळकर वर्णगपाळ कोल्हापूर प्रांतें स्वारीस बारा सहस्र स्वारा समावेत निघता झाला; तो ( कोल्हापूर येथील ) रंकाळे तळें याच्या समीप डेरे देऊन राहतां झाला; तो तळ्याचें उदक उत्तम पाहून निंबाळकर वर्णगपाळास इच्छा झाली, जे जळकोडा करावी. म्हणोन उदकांत कनाती देऊन वेश्यांसह वर्तमान जलक्रीडा करावयास लागला. संपूर्ण लोक आपआपले अश्व घोवावयास लागले; हेही उभयतां बंधू ( मालोजी व विठोजी ) आपले अश्व प्रक्षाळून, सेवकाचे हाती देऊन, उष्णांत उदकाबाहेर उभे राहून, आपण स्नान करिताती. तो तें समय भगवंतें कौतुक अपूर्व दाखविलें. विजापूरच्या यवनानें ( आदिलशाहा ) बारा सहस्र घोडा रवाना केला. वर्णग- पाळ हा पुंडाई करून तमाम पातशाही मुलूख खराब करितो; ( त्यास ) असावध पाहून जीतच धरून आणावा; म्हणून अकस्मात युद्धाकारणें सिद्ध होऊन चाल केली; तों दोह्रीं इतंवरी दोन निशाण मोकळी सोडून नगारे वाजवीत आले; तो एकच प्रळय झाला. संपूर्ण सैन्य गजबाजेलें; तितक्यामध्यें या उभय बंधूंनी " हरहर महादेव " ऐसा शब्द करून उपलाणीच ( घोड्याच्या उघच्या पाठीवर, खोगिराशिवायच, ) अश्वांवरीं स्वार होऊन, दोघांनी दोन फिरंगा (फिरंग म्हणजे एक प्रकारची तलवार; "फिरंगस्तु भवेदसिः " राजव्यवहार कोश. ) हाती घेऊन, आणि दोन माले अडासनी घालोन, सन्मुख होऊन समरांगण मिसळते झाले. तों ( आदिलशाही सैन्याचे ) दोन्ही इत्ती मदोन्मत्त नीट दोघां बंधूवरही महातांनी चालविले. तो भोळा चक्रवर्ती शंभू उभयतां बंधूंच्या हृदयकमळी प्रवेश करून ख्याती करविली. उभयतां बंधूंनी परस्पर विचार केला कीं, आजि शत वर्षे आपली पूर्ण झाली; आतां