पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६८)

येऊन भावी काळांतील स्वातंत्र्ययुद्धांत तिला विराट स्वरूप प्राप्त झालें. श्रद्धे- मध्ये राष्ट्रप्रेम, धर्मबुद्धी व एकतानवृत्ती उत्पन्न करून स्थीर करण्याचें सामर्थ्य असल्यामुळे, इ० सन १६४६ मध्ये शिवाजीनें तोरणा किल्ला घेऊन, इ० सन १६८० पर्यंतच्या चौतीस वर्षांत जी सतत तपश्चर्या करून श्रद्धेची सिद्धी मिळविली, तिच्या पुण्याईनें महाराष्ट्र देश एकतानतेनें अलौकिक आत्मयज्ञ कर ण्यास समर्थ झाला. राष्ट्राचा उद्धार होऊन तें स्वतंत्र व स्वावलंबी बनलें. श्रद्धेमध्ये संयतेंद्रिय होऊन स्वसुखाचा त्याग करण्याची व करीत राहण्याची प्रवृत्ती उत्पन्न करून ती दृढ व स्थिर करण्याची शक्ति असल्यामुळे, आत्मयज्ञ कसा करावा, हें शिवाजीच्या श्रद्धेनें व श्रद्धेच्या सिद्धीनें आपोआप राष्ट्राच्या ध्यानीं अॅलें, आणि राष्ट्र श्रद्धावान, एकतानप्रिय, आत्मयज्ञपूर्ण कार्यतप्तर व संयतेंद्रिय होऊन, शिवाजीच्या सिद्धीचें फळ जे स्वराज्य नें राष्ट्राच्या पद- रांत पडून अखेरीस महाराष्ट्र स्वराज्याच्या शिखरास पोहोचला. शहाजी व शिवाजी यांच्या कर्तृत्वामध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. उभयतांच्या तपश्चर्ये. मध्ये हा मननीय भेद आहे. दोघांची वागणूक, विचारसरणी, व श्रद्धा या मध्यें हत्त्वाचें व मननीय वौशष्य आहे, आणि म्हणूनच शिवाजीचें कर्तृत्व शहाजांहून श्रेष्ठ प्रकारचे आहे, हे उघड आहे. तथापि - म्हणजे शिवाजीचे कर्तृत्व शहाजीच्या मानानें अधिक श्रेष्ठ दर- जाचें असले तरी सुद्धां शहाजीच्या अंगी असाधारण कर्तृत्वशक्ति वसत होती, यांत तिळमात्रहि संदेह नाहीं; व त्याबद्दल त्यास योग्य तें स्थान दिल्या- शिवाय गत्यंतर नाहीं. शहाजी अथवा इतर मराठा सरदारमंडळी मुसलमान राज्यकत्यांना मोठीशी प्रिय होती, असें नाहीं; पण मराठ्यासारखा लढवय्या समाज, अपल्या लगाम ठेविल्यास तो आपल्या राज्याला व अंतर्बाह्य राज- कीय शांतलेला बळकटी आणण्याला, व परशत्रूशी झगडून आपणाला सुरक्षित करण्याला, अत्यंत उपयुक्त असल्यामुळे ते मराठ्यांना वरपांग मान देत असत; म्हणजे मराठा सरदारमंडळीला व विशेषतः शहाजीला असा मान देण्यांत मुसलमान राज्यकर्त्यांच्या अंतःकरणांत मतलबवृत्ति वास करीत होती. मराठा समाज आपणांशी राजनिष्ठेनें वागतो, म्हणून त्या समाजाविषय कृत. ज्ञातबुद्धि व्यक्त करणारा अंतःकरणाचा ओलावा त्यांत असला तरी फारसा