पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६५ )

सांप्रदाय पुढे सारखा बळावत गेला. शहाजीस आपल्या पक्षांत सामील करून घेण्याचा, अदिलशाहा व शहाजहान या उभयतांनीही दुबळेपणा दाखविल्या मुळे, शहाजी हा आस्तेआस्ते सारखा अधिक अधिक सत्ताधीश व बलिष्ठ बनत गेला व त्यानें आदिलशाही तख्ताच्या पायाखालील जमीन पोखरण्यास सुरवात केली. कर्नाटकमध्ये एक मांडलीको स्वराज्य स्थापना केलें. कोण- त्याही श्रेष्ठ अशा अंगीकृत कार्यातील यशाच्या प्रमाणाच्या सोनेरी काटपानें त्या कार्याच्या व्याप्तीचें व यशापयशाचें मोजमाप करावयाचे नसतें. स्वराज्य- संस्थापनेचा शहाजीचा प्रयत्न व्हावा तितका पूर्णपणे यशस्त्रों झाला नाहीं, ह्मणून त्याने हाती घेतलेल्या महत्कार्याचें श्रेष्ठत्व व महत्व तिळमात्रही कमी झाले नसतें, व कमी होतही नाहीं. अंगीकृत कार्यात पूर्णपणे अथवा कांही प्रमाणांत यश येणें, अथवा पूर्ण किंवा कमीअधिक प्रमाणांत अपयश येणे, त्या गोष्टोवर त्या कार्याचें श्रेष्ठत्व अथवा महत्व केव्हांदी अवलंबून नसतें. अपयश येणे हा कार्यकर्त्याचा गुन्हा नाहीं; अंगीकृत कार्य श्रेष्ठ दरजाचे आहे की नाही, हाच प्रधान प्रश्न सोडवावयाचा आहे; ध्येय उच्चतर आहे की नाहीं हीच महत्वाची बाब विचारांत घ्यावयाची आहे; ह्मणजे अंगीकृत कार्य श्रेष्ठ दरजाचें आहे, ध्येय उच्चतर आहे, हैं नको ठरल्यावर, पूर्ण यश आलें, कोही प्रमाणांत आलें, पूर्ण अपयश आलें, कांहीं प्रमाणात आलें, तरी ते कार्य, व तें कार्य करण्यांत पुढाकार घेणारी ती व्यक्ती, केव्हाही अभिनंद- नीयच ठरतील हे उघड आहे.

 शहाजीनें आदिलशाही राजसत्तेचा पाया पोखरला ही गोष्ट अगदी खरी आहे; आणि त्याच्या कार्याचे श्रेष्ठत्व व महत्वही मान्य करणे आवश्यक आहे, हेही तितकेंच सत्य आहे. परंतु मुसलमानी राजसत्तेचा डोलारा कोस- ळून पाडण्याचे अलौकिक कार्य शहाजीच्या हांतून पूर्णतेस गेलें नाहीं. तें महत्कार्य शिवाजीने तडीस नेलें. शिवाजीच्या सांप्रदायांतील मराठा मंडळींनी तडीस नेलें, ही गोष्ट तितकीच सत्य आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचें कार्य शहाजांच्या हांतून पूर्णतेस गेलें नाहीं, तरीसुद्धा त्या कार्याची सुरवात त्याच्याच वेळेपासून झालेली होती. शहाजीच्या काळापासूनच महाराष्ट्रांत स्वराज्य संस्थापनेचें कार्य सुरू झाले होतें. दक्षिणेमधील आपसांतील मुसल