पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२१ )

ओघानेंच प्राप्त होते; आणि त्यांतूनच महत्वाकांक्षी सहकरितावाद्यांना भावी स्वराज्याची स्वप्ने पडू लागतात.

 " शहाजांच्या पूच्या पिढीतील मराठे मनसबदारांना असले सुखस्वप्न क्वचित पडले असेल, परंतु आपल्या अंगचे वाढते वर्तृत्व, आणि यवनी सत्तेवें दौर्बल्य, यांची तुलना करून शहाजीनें असा कयास बांधिला होता की, स्वराज्याचें पक्क फळ यवनी सत्तेच्या वृक्षापासून तुटूत अलगत आपल्या पद- रांत पडल्या वाचून राहणार नाही. " जुलमी परकीय राजांचा नाश कराव- याचा म्हटला म्हणजे त्यांची नौकरी करून, व विश्वास संपादन करून योग्य समयी त्यास गचांडी देण्याचा मार्ग जित लोकांनां सदा श्रेयस्कर, सुरक्षित व न्याय्य आहे;" अशी शहाजांची समजूत झाली होती; आणि निजामशाहीची वजीरी करतां करतां लहानगा मूर्तेजा दरबाराला भितो, या मिषने त्यास तरुन वर घऊन बसण्याचा परिपाठ पाडून दरबान्यांच्या नजरेला हिंदू राजा तख्तावर बसलेला पाहण्याची संवय लावून त्याने आपले ध्येय बहुतांशी साध्य करून घेतले. शहाजचा मनसबदारी एकाद्या शहाला शोभेल अशी तोलदार फौज बाळगणारी झाली असल्या मनसबदारीला कह्यात ठेवणें मोठे जिवावरचें, व संकटाचे काम होऊन बसतें; " सुखविली तर ती आय तीच अलगत प्रेमानें उरावर बसते, आणि दुख वेली तर रागावून प्राण घेते.” शहाजीची समजून अशी झाली होती की, मूर्तिजशदा व त्याचा दिवाण मलेकंबर हे आपणांस दुखवूं शकणार नाहीत; आणि यदाकदाचित त्यांनी तसला मूर्खपणा केलाच, तर आपण त्यांचा समूळ उच्छेद करूं शकूं; पण त्याचे हे दोनहि अंदाज चुचे ठरलें; निजामशाहीतून त्याची हकालपट्टी झाली; आणि त्या बद्दलचा सूड उगविण्याचे आपले सामध्ये अत्यंत कोर्ते आहे, असेंद्दि त्यास कळून आले. ज्या दिवशीं शहाजीला निजामशाहीनें दुखविलें, त्या दिवशो हिंदुस्थानांत सहाशे वर्षे बांधत असलेल्या इस्लामाच्या तांत पहिले भगदाड पडले, आणि इस्लामी सत्ता हिंदुस्थानांतून कायमची बाद होण्याच्या मार्गास लागली. "

 " तथापि इस्लामी तट जमिनदोस्त करण्याची कामगिरी शहाजीसारख्या यावज्जन्म सहकारी मनसदारी करणान्याच्या हांतून होणें शक्य नव्हते; ते