पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१६ )

सबब समाजाला दैन्य आलें, व तें भोगिन्याखेरीज गत्यनर नाही, असें रडगाणे गाऊन स्वस्थ बसणारे ऐदी किती तरी होते. "विठोवा सर्व काही योग्य वेळी नीट करील, त्याला जनतेची काळजी आहे;" असे समाधान करून घेणारे भक्तिमागी तर असंख्य होते. मुसलमानी पेहराव, मुसलमानी चाली. रिती, मुसलमानी भषा, व मुसलमानी धर्म स्वीकारून समाजाच्या यातना बंद करूं पाहणारे किती तरी हिंदू प्रांतोप्रांतों पर होऊन बसले होते. यवनावर रुसून, त्यांच्याशी व्यवहार बंद करून, त्यांचे मुखा वलोकन न करणारी दासोपंतादिक मंडळीही आपल्याकडून यवनांच्या पारिप- त्याचे प्रयत्न करीतच होती. यवनसेवा करून जनतेचा परामर्ष घेऊं पाहणार दामाजीपंतही+ अनेक होऊन गेले, यवनाविरुक्त बंड करून स्वराज्य मिळ-


वयाच्या सोळाव्या वर्षी उपरति होऊन तो रामभक्त बनला. त्यानें “योग संग्राम " या नावाचा एक वेदांतविषयक ग्रंथ इ० सन १६६४ मध्यें लिहिला; व या शिवाय, वेदोत विषयावरील त्याचे आणखीही कित्येक ग्रंथ आहेत. शेख महंमदाचे अनुयायी हिंदू प्रमाणे वागतात; परंतु ते मुसल- मानाशी शरीरसंबंध ठेवितात.

 * दासोपंत (जन्म इ० सन १५७८; मृत्यू इ० सन १६१५ ) हा बहा मनी राज्याच्या काळांत एक प्रसिद्ध साधु पुरुष व कवी होऊन गेला. त्याचा बाप बहामनी राज्यांत नौकशंस होता; व सेवेत अंतर पडल्यामुळे दास्रो- पंतास ओलांस ठेवून तो बेदर येथून परत आला होता. दासोपंत हा महान् दत्तभक्त होता, तो बेदर येथे प्रतिबंधांत असतो त्यास तेथील लोकांनी मुल. मान करण्याचे ठरविले; तेव्हा त्याने श्रीगुरू दत्त त्रयाचा धांवा केल्यावर दत्ताने त्याचा सुटका केली. दासोपंताचा ग्रंथसंग्रह अतीशयच मोठा आहे. व सवालाख पदार्णव, व सवा लाख गीतार्णव, एवढा त्याचा ग्रंथसमूह मरा- ठीत असून तितकाच संस्कृतातही आहे दासोपंत हा जोगाईचे आंबें तेथें इ० सन १६१५ मध्ये मृत्यू पावला; त्या ठिकाणी त्याची समाधी व मठ आहे.

 + दामाजीपंत ( इ० सन १४७५) दा बहामनी राज्याच्या काळांत एक मोठा भगवद्भक्त होऊग गेला, तो मंगळवेढे येथे कारभारावर असत