पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०६ )

क्रिया केली; प्रीतिश्राद्धादि विधी यथासांग करून लक्ष भोजनें घातली; पुष्कळ दानधर्म केला; शहाजी बेदनूर प्रांत बेदिकरें ऊर्फ बासवा- पट्टणजवळ तुंगभद्रेच्या कांठी, अरण्यांत घोड्यावरून पडून मृत्यू पावला; त्या ठिकाणी शिवाजीनें पुष्कळ संपत्ति खर्च करून आपल्या वडिलांची छत्री बांधिली; येथें पुष्कळ दानधर्म केला; या छत्रीच्या पुजेसाठी शिवाजीनें यरगटनहळ्ळी, हे गांव विजापूरकराकडून मागून घेऊन तें छत्रीस इनाम करून दिलें; शिवाजीनें केलेल्या ह्या व्यवस्थेप्रमाणें शहाजी राजे याच्या ह्या छत्रीसन्निध - त्या वीर पुरुषाच्या आत्म्याच्या शांतवनाकरितो, व सन्मानाकरितां - पुष्कळ वर्षे नंदादीप जळत असत; परंतु आता तर ही छत्री अगदीच मोडकळीस आलेली असून तिचे अवशेषच मात्र इल्ली कायते अस्तित्वांत राहिले आहेत.

[

मागील मजकूर २०२ पृष्ठावरून चालु.]

फौज लहान असली तरी तिला मोंगलासारख्या जबरदस्त शत्रूच्या मोठ्या सैन्यापुढे टिकाव धरितां येतो, व प्रसंगी त्या सैन्याबरोबर टकरही देतां येते, हे त्याने कृतीनें प्रत्यक्ष सिद्ध करून दाखविलें म्हणजे मोंगलांच्या अमोघ सामर्थ्याचा बागूलबोवा त्यानें जमीनीत कायमचा गाडून टाकिला; आणि त्यामुळेच, त्याच्या ह्या असामान्य कृत्यापासूनच पुढे स्वतंत्र मराठी राष्ट्रसंस्थापनेची कल्पना आविर्भूत झाली.

 वरील विवेचनावरून शहाजीची योग्यता सहज निदर्शनास येते; ( मराठी रियासत पान २७७-२८३ पहा. ) त्याचा पुत्र शिवाजी हा तर स्वतःच राज्यकर्ता झाला; परंतु शहाजी हा त्याचे खालोखालचा राज्याची घडामोड करणारा, हातांत घरीन त्यास राज्यपद देईन, अशा हिंमतीचा बाणेदार सरदार होता. शौर्य, उत्साह, धाडस हे गूण त्याच्या अंगीं वसत होतेच, तथापि त्याचा विशेष गूण म्हटला म्हणजे घन्याची नोकरी एकनिष्ठपणानें बजावणें, द्दा होय. निजामशाहीची नौकरी करितांना त्याजवर अनेक संकटें