पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५४ )

बाजूंनी रस्ता बंद केला. शेवटी दात तृण घरून जुम्ला एकदाचा शाहाजी सांगेल तो तह मान्य करण्यास राजी झाला. ह्या युद्धांत हत्ती, घोडे, तोफा, वगैरे जुमल्याचा सर्व जंगी सरंजाम शाहाजीच्या हाती लागून शिवाय जड जवाहार वगैरेंहि शहाजीस बरेंच मिळाले. जुम्ला शहाजीस पेषकस म्हणजे खंडणी व लढाईचा खर्च देण्यास राजी झाला. ह्या युद्धाचा असा परिणाम झाला की, कुत्बशादा किंवा त्याचा कोणी सरदार यांनी पुन्हां कर्नाटकांत पाऊल म्हणून घातले नाहीं. पूर्व समुद्रापर्यंत सारें कर्नाटक शहाजोच्या चरणी मिलिंदायमान झाले. मीरजुम्ला हा हिंदुस्थानांतील व हिंदुस्थानाबाहेरील सर्व मोठमोठ्या दरबारांत प्रसिद्ध असून त्याचा धुव्वा शहाजीनें उडविला हो बातमी जेव्हां शहरोंशहरों व प्रांतोप्रांती पसरली तेव्हां शहाजीच्या साम- र्थ्याची बडेजाव चोहोंकडे झाली. जयराम लिहितो, “ह्या पराक्रमानें शहाजीचे नांव सेतुबंध रामेश्वरापासून रूमशामपर्यंत ज्याच्या त्याच्या तोंडीं निघू लागले. मीर जुम्ला याच्या सारख्या तोलदार सरदाराची ही दुर्दशा उडा- लेली पाहून शहानशहा जो शहाजहान तोही दचकला. महंमद आदिलशाहा तर मनातल्या मनांत खजील होऊन गेला. मीरजुमल्यावर जय मिळून आदिलशहांचा दबदबा राहिला या विचारानें यद्यपि त्यास आनंद झाला, तत्रापि शहाजीचा बोलबाला अंदाजाबाहेर झालेला पाहून तो अतीशय विषण्ण होऊन गेला. शहाजीने विजापूरचें नांव राखिलें, शहाजीच्या पराक्रमानें आदिलशाहीचें रक्षण झालें, वगैरे गौरवाची भाषा आदिलशाहा वापरी; परंतु त्या भाषेत केवढे थोरलें तथ्य भरलें आहे, हें मनांत येऊन त्यास शहाजीचें भय वाटे." यावरून शहाजी राजे हे आदिलशाहातील एक किती बर्डे प्रस्थ होतें, याची सहज कल्पना करता येतें.

 अशा रीतीनें मीरजुम्ला याची वाताहत केल्यानंतर ( इ० सन १६५३ ) शहाजीनें विजयानगरकर रायलू याच्यावर स्वारी करून व त्याचा जंतकल येथें पराभव करून त्याचें बंड मोडून टाकिलें, पेनकोंडा, कर्नूल, वेल्लोर, कपली वगैरे पूर्वेकडील प्रांत काबीज केले; अल्लमगड हस्तगत करून पोर्तुगी- जांच्या ताब्यांतील गोंवा प्रांतावर स्वारी केली, आणि तेल्लीचेरीपर्यंत आपली दौड करून बहुतेक सर्व कर्नाटक प्रांत त्यानें पुन्हां पूर्वीप्रमाणे आपल्या