पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४९ )

बाजी घोरपडथाला शिक्षा करण्याविषयों कळविलें नसतें, तरी शिवाजीनें त्याची उपेक्षा केली नसतीच, शहाजीचें पत्र आल्यानंतर बाजी घोरपडयास नामशेष करण्याची योग्य संधी शिवाजो सारखा पहात टपून बसलेला होता; ती संधी शिवाजीस पुढे नऊ वर्षांनी प्राप्त झाली. इ०सन १६६१ मध्ये वाडीकर लखम सांवत, विजापूरकर सरदार खवासखान व बहिलोलखान व मुधो- ळकर बाजी घोरपडे हे एकल होऊन शिवाजीस नामशेष करण्याच्या विचा- रांत होते; इतक्यांत कर्नाटकमधून शहाजीचे शिवाजीस पत्र आलें, व त्या- वरून बाजी घोरपडे हा भावी मोहिमेच्या तयारीसाठी मुधोळ येथे गेला असल्याचे त्यास कळले. या वेळी शहाजीने शिवाजीस जे पत्र पाठविलें, त्यांत त्याने त्याला असे कळविले की, “ बाजी घोरपडे यानें स्वधर्म संरक्षण करण्याच्या कार्याला मदत तर केली नाहींच, पण उलट तो मुसलमान व तुर्क यांच्या दग्याच्या कारस्थानांत त्यांना सामील झाला; आणि निंद्य व कपटाचे आचरण करून तो आम्हांला विजापूर येथे घेऊन गेला. तेथे आम्हास नेल्यावर आमच्यावर कोणता दुर्धर प्रसंग ओढवला होता, याची तुम्हास जाणीव आहेच; मराठ्यांची सत्ता स्थापित करून, स्वधर्म संरक्षण करण्याची तुम्ही जी महत्वाकांक्षा धारण केली, ती यशस्वी होऊन, तुमचा मनोरथ सिद्धीस न्यावा, असाच त्या सर्वशक्तीमान परमेश्वराचा संकल्प आहे, असे आतां उघड उघड निदर्शनास येत आहे; आणि म्हणूनच आमच्या वरील ही तो दुर्धर प्रसंग टळला, हे उघड आहे. हल्ली खवासखान हा तुमच्या- विषय दुर्बुद्धि मनांत धरून तुमच्यावर स्वारी करून गेत आहे, आणि मुधो- ळकर बाजी घोरपडे व सांवत वाडीकर लखम सांवत व खेम सांवत हे त्याला ह्या स्वारीत साह्यकारी झालेले आहेत. ह्या प्रसंगी शिव आणि भवानी हीं तुम्हास यश देवोत. ह्या सर्वांचा पूर्णपणे सूड घ्यावा अशी आमची इच्छा आहे; आणि आपल्या पित्याची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास नेहमीं तत्पर असा तुमच्यासारखा आज्ञाधारक पुत्र सुदैवानें आम्हांस लाभला अस ल्यामुळे, तुम्ही ही कामगिरां तडीस न्या, अशी आमची तुम्हास आज्ञा आहे. हल्ली बाजी घोरपडे हा आपल्या लोकांसह मुधोळ येथे पुढे गेलेला आहे. " शिवाजीस शहाचीचें हे पत्र मिळाल्याबरोबर तो आपणाबरोबर तीन