पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३९ )

बादशहाशीं शत्रुत्व संपादन करून घेण्याचा मार्गही स्वीकारतां येईना निजामशाहीवर आलेली मोंगलाची घाड महंमद अदिलशहा विसरला नव्हता; शहाजहाननें निजामशाही राज्य नामशेष करण्याकरितां केवढा अट्टाहास केला व तें राज्य नष्ट केल्यावरच तो कसा शांत झाला, हे त्याच्या आठवणीत होतें; तो शहाजहानचा मांडलीक म्हणवीत होता; त्याला अतीशय भीत होता; आणि शहाजीमुळे शहाजहानशी वैर उत्पन्न केल्यास तो आपली व आपल्या राज्याची पाळेमुळे खणून काढील, अशी अदिलशहास पूर्ण खात्री होती; शिवाय तो भोळा व शांत वृत्तीचा असून त्याची प्रकृतिही पुढे सारखी ना- दुरुस्त राहिल्याने त्याच्यातील हिंमत व तडफ पार नाहींशी झाली होती. आणि दरबारांतही शहाजीच्या पक्षाची भंडळी असून तो त्याच्या मुक्तनेबद्दल खट- पट करीत होती. इतक्यांतच ज्याच्या बळावर महंमदशहा उडया मारीत होता, तो शहाचा बदसल्लागार सरदार मुस्तफाखन हा एकाएकी मृत्यू पावला; पण शहाजीविषयी त्याच्या मनांत इतका उभा दावा होता की, मरतांमरतांही " शहाजीवर चांगली नजर ठेवा; " असे सांगून त्याने प्राण सोडिला ( इ० सन १६४८). मुस्तफाखान मेल्यामुळे तर अदिलशहा अग- दींच निराधार झाला. शहाजीशी नरम गोष्टी बोलू लागला;तुमच्याकडे कांदीदी अपराध नाहीं; तुम्हाला पकडण्याचा की मुस्तफाखानाला हुकूम दिला नव्हता; फक्त दरबारी एकदां येऊन जा एवढाच काय तो निरोप तुम्हास पोहोचविण्यास मुस्तफाखानास सांगितले होते; परंतु त्यानें बेवकूच पणानें तुम्हास अटक केली; आतां दिलसफा करून व झाल्या गोष्टी विसरून जा; मी आपणास कर्नाटकमध्ये परत जाण्याची परवानगी देतों. आपण उभयतो पुत्रांना अविरून घरा, व आपल्या जहागिरीवर सुखरूप अंमल करा." अशा गोड, मऊ, व नरम भाषा महंमदशहा वापरूं लागला व त्यानें शहाजीस बंधमुक्त करून कर्नाटकमध्ये परत जाण्याची परवानगी दिली+


 +या वेळी आदिलशाने त्याची सक्त कैद कमी करून त्यास जामिनावर खुलें केलें; परंतु कर्नाटकमध्यें परत जाण्याची परवानगी न देतां त्यास विजापूर येथेच आपल्या नजरेखाला ठेविले; त्या ठिकाणी तो इ० सन १६४९ ते इ० सन १६५२