पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३२ )

सैन्याला कळून त्यांच्या व मुस्तफाखानाच्या सैन्यामध्ये एक जोराची चक- मक उलाली; परंतु त्यांत शहाजीच्या पक्षास अपयश आलें; व बरेंच सामान मुस्तफाखानाच्या हाती लागले; परंतु शहाजीचे तीन हजार स्वार व सर- दार बंगळूरकडे निसटून गेले. इकडे बाजी घोरपड्याने शहाजीस पकडल्या- वर, त्यास मुस्तफाखानाकडे नेऊन हजर केलें; व मुस्तफाखानानें योग्य तो बंदोबस्तानें त्याची लागलीच विजापूर येथे महंमद अदिलशहाकडे रवानगी करून दिली.

यतांमध्ये युद्ध होऊन घोरपड्यानें शहाजीस वार करून पकडले, असा तंजावरच्या शिलालेखांत उल्लेख आहे. परंतु बखरीमध्ये शहाजीचा मुक्काम तंजावरजवळ जिरावाडी येथें असतां बाजी घोरपड्यानें त्यास आपल्या घरी मेज- वानीस बोलावून दग्यानें त्याचे पाय धरून त्याला कैद केले, असा उल्लेख आहे.

 फारशी तवारिखतही या बाबतीत उल्लेख आढळतो; तो खालीलप्रमाणे:-
 इ० सन १६४७मध्यें, विजापूरकर सरदार मुस्तफाखान यानें कर्नाटक प्रांतांतील प्रसिद्ध व बळकट असा दक्षिण अर्काट जिल्ह्यांतील, कृष्णागिरी ( किस्नागिरी ) ( Kistnagiri ) येथून समुद्रकिना-याला जाणाऱ्या सडकेवर त्रिवेंद्रम येथून अजमार्से अठरा मैलांवर असलेला जिंजीचा किल्ला व सर्व दक्षिण भाग हस्तगत करून घेतला; ( ता० १७ दिजंबर ६० सन १६४९ ). त्या वेळी अदिलशहाच्या हुकमाप्रमाणे मुस्तफाखानानें बाजी घोरपडे यांस शहाजीस पकडण्यास सांगितलें; त्याप्रमाणे घोरपड्यानें शहाजीस दग्यानें न पकडतां छापा घालून पकडले, असा कित्येक ठिकाणी उल्लेख आहे; पण तो छापाच मुळीं दग्याचा होता, असें “बसातीन-ई संलातीन " या अदिलशाही राज्याच्या फारशी तवारिखीत (पान ३०९ - ३११ पहा ) लिहि लेले आहे; यासंबंधी जहूर जहूरी याने आपल्या " महमंदनामा " या तवारि- खींत असे लिहिले आहे की, ( पान ३७१-३७२ पहा ) जिंजी येथील वेढा व युद्धप्रसंग पुष्कळ दिवस चालू राहिला; तेव्हा शहाजीनें मुस्तफा खान यांस अशी विनंती केली की, " माझें सैन्य या सततच्या युद्धप्रसंगामुळें थकून गेले आहे; तरी सैन्याला विश्रांती देण्याकरिता मला माझ्या प्रदेशांत