पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३० )

पुढें उपेक्षा करण्याची सोयच राहिली नाहीं, अशी आदिलशहाची पूर्ण खात्री झाली व त्यानें मुस्तफाखानास शहाजीला कपटानें पकडण्याचा हुकूम दिला; या वेळी मुस्तफाखान चंदी प्रांतांत असून दिलावरखान, फगद-


सर्व संबंध पूर्णपणे तोडून टाकला आहे; त्यामुळे आतो त्यांचा माझा बिलकूल संबंध राहिला नाहीं. " परंतु शहाजीची अंतस्थरीत्या शिवाजीस फूस होती, इतकेच नाही तर खुद्द शहाजीचाही स्वतंत्र राज्यस्थापना करण्याचा उद्योग सुरू होता, ही गोष्ट सिद्ध करण्यास भरपूर पुरावा सांपडला आहे; त्या- पैकी पहिला हा आहे की, शहाजीनें दिलेल्या कांही सनदा व दुसरे कागद- पत्र उपलब्ध झाले आहेत; त्यांतील भाषेत रीतीप्रमाणें “वरिष्ट सरकार तर्फे " असा उल्लेख नसून "शहाजी राजे भोसले यांच्या दरबारांतून" असा उल्लेख केलेला आहे; आणि दुसरा पुरावा हा आहे की, बाजी घोरपडे यानें अदिल- शहाच्या हुकुमानें शहाजीस दग्याने पकडलें याबद्दल त्याचा सूड घेण्याविषयों शहाजीने मोठ्या आप्रदानें शिवाजीस पुढे बजावलें; व त्याप्रमाणे शिवाजनें बाजी घोरपड्यास ठार मारल्याचे शहाजीस समज तेव्हां त्यास फार कृत- कृत्यता वाटली, म्हणजे अदिलशहास शहाजीविरुद्ध उपरीनिर्दिष्ट पुरावा मिळाल्यामुळे त्यानें शहाजीस पकडून केद करण्याची तजवीज केली.

 याशिवाय तिसराही एक पुरावा उपलब्ध आहे; तो असा कीं, शहाजी या अदिलशाही प्राणसंकटांतून मुक्त होतां व त्याने वास्तवांकरीत्या शिवाजीस अशी ताकीद द्यावयास पाहिजे होती की, " पुन्हा असा बंडावा करून माझ्या जिवावर संकट आणूं नकोस, " पण तसे न करिती उलट रोहिडखोरेकर कान्होजी नाईक जेधे देशमूख याच्या पासून बेल रोटीवर हात ठेवून त्यानें अशी आणमाक घेवविली की, "चिरंजीव राजश्री सिउवा (शिवाजी) खेडे बारियात व पुर्णा आहेत. त्या जवळ तुम्ही जमावानसी राहावें. तुमची जबरदस्ती त्यां प्रांत आहे. अवघे मावळचे देशमूख देखील त्यांसी (शिवाजीशी ) रुजू होऊन त्यांचे आज्ञेत वर्तेत येसा विचार करून जबरदस्तीने राहावें. येखादी मोंगलाई कडील फौज व ईदिलशाहीकडील (विजापूराकडील ) फोज आली तरी आपण इमान राखावें त्यासी लढाई करावी, येसी शफत इमान पुरस्कर