पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११९)

दारांना आपल्या नियंत्रणाखाली आणिलें; कर्नाटक प्रांतोत असलेली अव्यवस्था व माजलेली अंदाधुंदी पूर्णपणे मोडून टाकून सर्व कर्नाटकभर आदिलशाहाची सत्ता स्थापन केली; इ० सन १५६५ मध्यें, (शके १४८६, माघ शुद्धपंचमी) राक्षस- तागडी येथील युद्धामध्ये रामराजाचा नाश होऊन, विजयानगर येथील साम्राज्य- सत्तेचा चुराडा उडाल्यानंतर सर्व कर्नाटक प्रांतामध्यें बेबंदशाही माजली; "ठिकठिकाणचे मांडलीक राजे, पाळेगार व जमिनदार, स्वतंत्र होऊन, आपल्या ताब्यांत येईल तेवढा प्रांत बळकावून बसले; आणि विजापूर, गोवळ. कोंडे येथील बादशहांचा फारच त्रास झाला तर तेवढ्यापुरती खंडणी अथवा करभार देऊन व त्यांचे सार्वभौमत्व स्वीकारून नम्रपणे वागावें, व बादशाही सैन्याने पाठ फिरविली की पुन्हां स्वतंत्र होऊन शिरजोरपणाने वागावें, असा त्यांनी कम चालविला होता. विजापूर, अहंमदनगर, व गोवळकोंडे, ह्या तिन्हीं राज्यांमध्यें, अंतःकलह, परस्पर मत्सर, आणि दरबारी मुत्सद्दयांची स्वार्थसाधक चढाओढ, त्यांच्या योगानें सुयंत्रित राज्यव्यवस्था कोठेही चार दिवस देखील टिकेनाशी झाल्यामुळे, कर्नाटक प्रांतांतील पाळेगार व मांडलीक राजे ह्यांच्यावर सक्त नजर ठेवण्यास कोणासच सवढ मिळाली नाही. त्यानंतर सतराव्या शतकाच्या प्रारंभापासून दिल्लीध्या मोंगल सैन्यानें दक्षिण प्रांत जिंकून घेऊन, तेथें दिल्लीपतीची सत्ता प्रस्थापित करण्याचा अटोकाट प्रयत्न चालविल्यामुळे, वर निदिष्ट केलेल्या म्हणजे विजापूर गोळकोंडें व अहेमदनगर येथील अदिलशाही, कुत्बशाही व निजामशाही ह्या तिन्ही राज्यांच्या मुसल मानी बादशहाना, आपली राज्य सांभाळता सांभाळतां पुरेवाट झाली. अर्थात् अशा स्थितीमध्ये कर्नाटकचे पाळेगार, जमिनदार व मांडलीक राजे अधिक शिरजोर व स्वतंत्र व्हावेत, त्यांत आश्चर्य नाहीं. ह्याप्रमाणे म्हैसूर, तंजावर, जिंज, चंद्रगिरी, कनकगिरी, मधुरा, बेदनूर, त्रिचनापल्ली इत्यादि ठिकाणचे हिंदु राजे व सुभेदार, पाळेगार व जमिनदार इ० सन १६०० पासून इ सन १६३० पर्यंत, अगदर्दी स्वतंत्र रीतीनें वागूं लागले होते असे म्हणण्यास हरकत नाहीं " ( पारसनीस; तंजावरचें राजघराणे ). अशा प्रकारची चालू असलेली अंदाधुंदी मोडून टाकून कर्नाटकचा प्रदेश आपल्या हस्तगत करून ध्यावा, या इच्छेने अदिलशहानें शहाजीची त्या प्रांती रवानगी केली, व