पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११४ )

निर्दिष्ट साही किल्ल्यांच्या सोडचिठ्ठया, खानजमान याच्या हवाली करून ( इ० सन १६३६; आक्टोबर ) शहाजी या संकटांतून मुक्त झाला. खान- जमान यानें मूर्तुजा शहास योग्य बंदोबस्तानें आप्रा येथें शहाजहान बादशहाकडे रवाना केलें; X बादशहानें त्याची ग्वाल्हेर येथील किल्लघांत रवानगी केली; व त्याच ठिकाण प्रतिबंधांत तो पुढें मृत्यू पावला.

 त्यानंतर शहाजी हा, जिजाबाई व शिवाजी या उभयतांना पुण्यास ठेवून, आपला वडील मुलगा संभाजी यांसह, रणदुल्लाखान याच्याबरोबर विजापूर येथें गेला; व त्यानेंच तेथे शहाजीची व अदिलशहाची भेट करून दिली. दरबारात भेटीच्या वेळीं मोठा समारंभ झाला; त्यावेळी शहाजीवर मोर्चेले झडत होती. आणि दोन कमी अधिक ऐश्वर्याचे राजे एकमेकांस भेटतात


 X शहाजहान बादशहानें अदिलशद्दार्शी तद्द केला, त्याच सुमारास शरण आलेल्या गोवळकोंडेकर अब्दुला कुत्बशहानें चाळीस लाख रुपये शहा- जानकडे नजराणा म्हणून पाठविले; व चार लाख दोन खंडणी देण्याचे कबूल केलें; तथापि कुत्बशहा आपणांस कोणत्याही प्रकारे त्रास न देतां शरण आला ही गोष्ट लक्षांत घेऊन शहाजहान यानें त्यास अर्धी खंडणी माफ केली. अदिलशहाशी तह झाल्यानंतर त्यानें बादशहास विनंती केली की, " येथे आपण मोठमोठ्या फौजा घेऊन राहिल्याने लोकांचे शेतकी वगैरेचे धंदे चालत नाहीत; शिवाय शहाजीच्या ताब्यांत असलेले किल्ले आम्ही हस्तगत करून घेऊं; तरी आपण आतां येथून परत गेल्यास बरें होईल. " अदिल- शहाचें हे म्हणणें बादशहास मान्य झालें; व तो ता० ११ जुलई इ० सन १६३६ रोजी दौलताबाद सोडून मांडवगडाकडे गेला, व मार्गातच तीन दिवसांनी ता० १४ रोजी त्यानें अवरंगजेबास दक्षिण प्रांताचा सुभेदार नेमिल; व त्यानें ता० १६ जुलै इ० सन १६३६ पासून ता० २८ मे ६० सन १६४४ पर्यंत या प्रांताचा कारभार पाहिला. या वेळी मोंगलांच्या ताब्यांतील प्रदेशाचे, खानदेश, वहाड, तेलंगण, व अहंमदनगर हे चार जिल्हे असून, त्यांत एकंदर ६४ किल्ले होते; व या सर्व प्रदेशाचा चार कोट रुपये वसूल होता.