पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०५ )

पाठोपाठ शाइस्तेखानही तेथे गेला; तो आला असे पाहून संभाजी कोळवणांत शिरला; व दुसऱ्या घाटानें परत येऊन त्यानें अहंमदनगरपर्यंत लूटालूट


मुख्य रस्ते आहेत. शहरांत व आसपास बरीच प्रसिद्ध देवालयें व प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यांची माहिती थोडक्यांत खाली लिहिल्याप्रमाणे आहे तीः-
( १ ) सुंदर नारायण - हे देवालय जुन्या तऱ्हेच्या बांधणीचे असून
नव्या पुलाजवळ आहे; व त्यांस सरकारातून आठशे रुपयांची नेमणूक आहे.
( २ ) बालाजी -- हे मंदिर इ० सन १७७१ मध्ये बाप्पाजी बोवांनी
बांधिले असून त्यास तेरा गांवें इनाम आहेत; व त्याशिवाय कांहीं संस्था-
निकांनीही त्या देवस्थानास नेमणुका दिलेल्या आहेत; त्यामुळे हें संस्थान
श्रीमंत आहे.
( ३ ) गोरारामः - हें मंदिर चांदोरीचे जहागिरदार हिंगणे यांनी बांधिलें.
( ४ ) तिळ भांडेश्वर-हें देवालय त्रिंबकराव मामा पेठे यांनी इ० सन
१७६३ मध्यें बांघलें.
( ५ ) भद्रकाळी-- देवालय गणपतराव पटवर्धन यांनी इ० सन
१७९० मध्ये बांधिलें,

 गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर, नाशीकच्या समोरच "पंचवटी" हें गांव वसलेले असल्यानें, नाशीक मध्येच त्याचा समावेश करितात; येथे अनेक प्रसिद्ध व प्रक्षणीय देवालयें व स्थळे आहेत; त्यांची माहिती स्थलाभावामुळे अगदींच थोडक्यांत दिली आहे, ती खाली लिहिल्याप्रमाणें:-

 ( १ ) काळारामः- हें मंदीर विशेष प्रेक्षणीय असून तें रंगराव ओढेकर यांनी इ०सन १७८२ मध्ये बांधिले; त्यास तेवीस लक्ष रुपये खर्च आला. या देवालयास वापरलेला दगड रामशेजच्या डोंगरांतून आणला होता. दर राम- नवमीस येथे मोठा उत्सव होतो; व चैत्र शु० ११ स रथोत्सवाच्या वेळी या ठिकाणीं मोठी यात्रा भरत असते. या उत्सवाच्या व देवस्थानाच्या खर्चाकरितां शिंगवें हा गांव इनाम करून देण्यांत आला आहे. ओढे हा गांव नाशिक जिल्ह्यांतच गोदातीरीं असून तो रंगराव ओढेवर यांस पेशव्याकडून जहागीर मिळालेला आहे.