पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०३ )

मान्य केल्या नाहीत; तेव्हां शहाजहान यानें आपल्या सैन्याचे चार भाग करून त्यांतील दोघांची विजापूरकरावर व दोघांची शहाजीवर रवानगी केली; त्यावेळी खान डौरान यांस त्याच्या मदतीस आणखी एक सरदार देऊन बिजापूरकरावर पाठविलें; आणि शहाजीवर पाठविलेल्या सैन्यापैकी एका भागा- वर शाइस्तेखानाची नेमणूक केली; व त्यास शहाजीच्या ताब्यांतील चांदवड, नाशीक व संगमनेरकडील सर्व प्रदेश व किल्ले हस्तगत करून घेण्याची काम- गिरी सोंपविली; व दुसऱ्या भागावर खान जमान यांस नेमून शहाजीस दक्षिणें- तील मैदान प्रदेशांतून हाकलून त्याचा पाठलाग करण्याची व त्याच्या ताब्यांतील कोंकणपट्टोंतील प्रदेश व किल्ले हस्तगत करून घेण्याची कामगिरी सांगितली.

 खान डौरान विजापूरकरावर चाल करून निघाल्यावर मार्गात भोसल्यांच्या मूळ वस्तीच्या गांवापैकी चांभारगोंदें उर्फ श्रीगोंदें X वगैरे गावें त्यानें लुटिलों; व शहाजीची बातमी ठेवून तो पारगांवकडे + आला. त्याठिकाणी त्याची व शहाजांची गांठ पडली; तथापि शहाजीनें सतत तीन महिने त्यास घुलकावण्या दाखविल्या; व अतीशय त्रासवून सोडिलें. इतक्यांत, " विजापूरकर मोंगलाश तह करण्याच्या वाटाघाटीत आहेत; " असें त्यास कळले; तेव्हां तो तसाच पश्चिमेकडे वळला;तोच खान जमान त्याच्या पाठीवर येऊन थडकला; व त्याने शहाजीस भीमापार पुण्यापर्यंत घालवांत नेले. नंतर शहाजीनें लोह-


 X श्रीगोंदे हे तालुक्याचें गांव, दौंड मनमाड रेलवेवरील पिपरी स्टेशन पासून अजमार्से सात मैलांवर व अहंमदनगरपासून अजमासें बत्तीस मैलांवर दक्षिणेस आहे.

 +पारगांव ऊर्फ पेडगांव, हें श्रीगोंदें तालुक्यांत असून श्रीगोंदें व पारगांव ह्रीं दोन्हीं गांवें सरस्वती नदीच्या कांठी आहेत; ही नदी कोथूळ जवळच्या डोंगरांत उगम पावून, तेथून दक्षिणेकडे वहात जाऊन पारगावाजवळ भीमा नदीस मिळते; म्हणजे पारगांव हैं ठिकाण सरस्वती व भिमा या दोन नद्यांच्या संगमावर आहे. पारगांव येथे बहादूरगड ह्या नांवाचा एक भुईकोट किल्ला आहे; व पूर्वकाळ हे महत्त्वाचें ठाणे म्हणून गणले गेलेले असून पेशव्यांच्या वेळी ह्या ठिकाणी परगण्याची कचेरी होती, असा उल्लेख आढळून येत आहे.