पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०१)

शहाजीवर पाठविलें; व ते उभयतां दक्षिणेत येऊन पोहोचल्याबरोबर खान डौरान यानें शहाजीवर मोम करण्याची मोठ्या जारीने तयारी केली.

 शहाजीस मोंगलांच्या एकंदर हालचालीची पूर्ण बातमी असल्यामुळे तो पहिल्यापासूनच सावध होता. त्यानें, खान डौरान आपणांवर चाल करून येण्याच्या पूर्वीच आपल्या ताब्यांतील निरनिराळ्या महत्वाच्या ठाण्यांवर अधीक शिबंदी पाठवून त्यांच्या बचावाची तजवीज केली; व आपला बारा वर्षांचा मुलगा संभाजी याजबरोबर दोन हजार स्वार देऊन, व त्यास संगम- नेर येथे ठेवून, त्या ठाण्याचें संरक्षण करण्याची व वेळ पडल्यास जुन्नर येथे कुमक करण्याची कामगिरी त्याच्याकडे सोंपविली; आणि आपण दौलताबादच्या आसपास तळ देऊन राहिला. इतक्यांत खान डौरान त्याच्यावर चाल करून आला; तेव्हा तो तेथून निघून रामदुधाकडे गेला; व त्या परगण्यांत त्यानें लुटालूट आरंभिली; तोंच खान डौरान देथे येऊन दाखल झाला; तेव्हां शहाजी लागलीच शेवगांव+ परगण्यांत घुसला; व तेथून मोहरीच्याx


 + शेवगांव हे तालुक्याचें ठिकाण अहंमदनगर जिल्ह्यांत ईशान्येस, अज- माझें बेचाळीस मैलांवर, अहंमदनगर - पैठण - औरंगाबाद सडकेवर आहे. या तालुक्याच्या सरहद्दीवर गोदावरी नदी असून पलीकडे निजामच्या राज्यांतील प्रदेश आहे; व पैठण हें निजाम इद्दाँत शेवगांव पासून बारा मैलांवर गोदावरी नदीच्या कांठी असून तेथें एकनाथ महाराजाची समाधी आहे. तेथें फाल्गुन वद्य ६ ला फार मोठी यात्रा भरते. येथे एक मोठा दगडी रांजण असून त्यांत हजारों लोक पाणी आणून टाकौत असतात; परंतु तो भरत नाहीं; पण यात्रेच्या म्हणजे नाथषष्ठीच्या दिवशीं तो उचंबळून वाहू लागतो. हाच चमत्कार पाहण्या- सारखा आहे. पूर्वी या शहरास " प्रतिष्ठान " असे म्हणत असत.

 xमोहरी घाट हा नगर जिल्ह्यांत जामखेड महालांत खर्डे-जामखेड-जाते- गांव या सडकेच्या रस्त्यावर आहे.

 विशेष माहिती: - खर्डे हा गांव जामखेड महालांत असून तो इतिहास- प्रसिद्ध आहे; त्यास " शिवपट्टण " असेही म्हणतात; येथील भुईकोट किल्ला पाहण्यासारखा असून याच ठिकाणी मराठे व निजाम यांच्यामधील प्रसिद्ध