पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९९ )

होता; त्यामुळे तो गोडीने जुन्नर हे ठिकाण आपल्या ताब्यांत देईल असें शहाजीस वाटत होते; म्हणून त्यानें श्रीनिवासरावास बोलावून घेऊन सांगि तले की, “निजामशहास राहण्यास योग्य जागा नाहीं; सबब तुझ्या ताब्यांत असलेले जुन्नर व आसपासचे किल्ले तूं सरकारांत परत दे; व त्याऐवजीं आम्ही तुझी दुसरीकडे व्यवस्था करून देतों. " परंतु त्याचें हें म्हणणे श्री- निवासराव यानें कांहीं केल्या मान्य केलें नाहीं; तेव्हां नाइलाजानें शहाजीनें त्यास कैद केलें; त्याची सर्व दौलत सरकारजमा केली; जुन्नर शहराचा ताबा घेतला; आणि त्याबरोबरच जीवधन, भोरग, परशगड, हर्षगड, माहुली, सौदा ऊर्फ सुंडा व खूज हे आसपासचे किल्ले शहाजीच्या ताब्यांत आले. त्या- नंतर त्यानें मूर्तुजाशहास जुन्नर येथे आणिलें; व तें शहर कांहीं काळ निजाम- शाहांची राजधानी बनले.

 अशा रीतीनें शहाजीने मोठया घडाडीने सिद्दीसैफ व श्रीनिवासराव या उभयतांचे पारिपत्य केल्यामुळे त्याचा अतीशय लौकीक झाला; महत्व वाढलें; त्यास गोवळकोंडेकरांची मदत मिळाली. निजामशाहीचा अभिमान बाळगणारी जहागिरदार, दरकदार- देशमूख, व इतर मंडळी त्याच्या पक्षास मिळाली; बेकार होऊन इकडे तिकडे भटकत फिरणारें निजामशाहीचें बारा तेरा हजार सैन्य आपण होऊन त्याच्याकडे येऊन, त्याच्या नौकरीत राहिलें; आणि स्वकीयांची सहानुभूती व साह्य, आणि विजापूर व गोवळकोंडे येथील परकीय राज्यांची मदत, यामुळे त्यास दुप्पट हिंमत येऊन त्यानें मोंगलांचा प्रतिकार करण्याची मोठया निश्चयानें व जोराने तयारी केली.

 इकडे मोंगल सरदार मोहबतखान हाही शहाजीचे सर्व बेत हाणून पाड- ण्याची खटपट करीत होता; त्यामुळे परांडा येथील प्रसिद्ध व नाक्याचा किल्ला आपल्या ताब्यांत घेण्याचा त्याचा मनसुबा होता; उलटपक्ष हा मह- स्त्वाचा किल्ला मोगलांच्या ताब्यांत जाऊ नये, याबद्दल अदिलशहाची खट- पट चालू होती. त्याप्रमाणे विजापूरकरांनी तेथील किल्लेदारास वळवून व त्यास तीन लक्ष होन देऊन तो किल्ला आपल्या ताब्यांत घेतला; त्यामुळे मोहबतखानास अतीशय राग आला; त्यानें शहाजादा सुजा यास मोठे सैन्य बरोबर देऊन परांड्याचा किल्ला हस्तगत करून घेण्यास पाठविलें; त्या-