पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९७)

हा समारंभ आटोपल्यावर ते उभयतां दौलताबादेवर चाल करून येण्यास निघाले;त्यावेळी मार्गात कोरेगांवनजीक भिमा व इंद्रायणी या नद्यांच्या संगमाव- रील नागरगांव ऊर्फ तुळापूर मुक्कामी ता. २३ सप्टेंबर इ. सन १६३३ रोजों, ( शके १५५५, श्रीमुखनाम संवत्सर, भाद्रपद महिना, अमावास्या, सोमवार रोजी अकरा घटकेस ) सूर्यग्रहण पडलें; ही सूर्यग्रहणपर्वणी साधून मुरार- पंतानें सांग व साभरण गजदान, अश्वदान, व गोशतदान केलें; आणि सुवर्ण- रजतादि चोवीस तुळादानें दिली. शिवाय सबंध तुळापूर गांव सोळा ब्राम्हणांस- १ सोनभट देवगिरिस्थ, २ नरसिंहभट अग्निहोत्री, ३ त्र्यंबकट नांदुर- कर, ४ त्र्यंबकभट सुदामे, ५ त्र्यंबकट खेडकर, ६ भानभट तळेगांवकर, ७ महादेवभट पुरंदरे, ८ त्र्यंबकभट पुराणीक, ९ पुरुषोत्तमभट वैष्णव, १० भानमट वैष्णव, ११ गोपतिभट ढेरे, १२ आपदेव चित्राव, १३ बाळपाठक नाशिककर, १४ रंगनाथभट प्रामज्योतिषी, १५ सोमनाथभट प्रामज्योतिषी, १६ पुंडलीक हरिदास पंढरपूरकर ह्या सोळा ब्राम्हणांस अप्रहार दिला; व त्याबद्दल विजापूरकर आदिलशाहाची पत्रे करून दिली. अग्रहार देण्याची अट अशी आहे कीं, दात्यानें देयांना सालंकृत घरें बांधून देऊन खेरीज झालों नसतील त्यांची लग्ने करून द्यावीं; त्याप्रमाणें गौड नांवाच्या कारागिराकडून ब्राम्हणांना त्याने सोळा घरें बांधून दिली. या व्यति- रिक्त कालिदास या नांवाच्या कवीला, वरुरचि या नांवाच्या विद्वानाला, त्रिमलभट या नांवाच्या स्वपुरोहिताला, व रायाराय या आडनांवाच्या ब्राम्ह णाला त्यानें भूमिदानें दिलीं; व पुष्कळच इतरही दानधर्म केला; यावेळी हत्तीची रौप्य तुला करून तें रुपें ब्राम्हणांना दान करावें, असा मुरारपंतानें विचार केला; परंतु हत्तीची तुला कशी करावयाची, याविषयी कोणासही युक्ति सुचेना. त्यावेळी शहाजीनें मुरारपंतास सुचविले की, हत्तीस होडींत चढवावें, आणि त्याच्या भारानें ती ज्या मर्यादेपर्यंत पाण्यांत बुडेल, त्या ठिकाणी खूण खरावी; नंतर इत्तोस होर्डीतून खाली काढून तीत पुन्हां दगड भरावे; व केलेल्या खुणेपर्यंत ती पाण्यांत बुडाली म्हणजे ते सर्व दगड घेऊन त्यांचे वजन करावें, म्हणजे हत्तीचें बरोबर वजन कळेल. त्या• काढून