Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९१ )

महत्वाचा व मनोवृत्तीस चालन देणारा असाच आहे यांत संशय नाही. कारण स्वतःच्या जिवापुढं जगांत कोणती वस्तू अथक प्रीय आहे? कशाची अर्धीक किंमत आहे ? कशाचे अधीक महत्व आहे ? वास्तविक स्वतःच्या जिवाहून अधीक प्रीयतम, मौल्यवान व महत्वाचे असे दुसरें कांहींदी नाहीं; पण हिंदू मनुष्याच्या दृष्टीने स्वतःच्या जीवाहूनही सत्याची थोरवी त्यास अधीक वाटते; हिंदूलोक सात्विक आहेत व सत्य मीय आहेत, याचे कारण काय ? याची कारणे आमच्या हिंदूंच्या धर्मग्रंथांतच आहेत. ज्या विशिष्ट गोष्टी चर आमचे आमा हिंदूचे अमोल्य ग्रंथ म्हणून गणले गेलेले रामायण रचि- लेले आहे, आणि जें आम्ही सर्व हिंदुस्थानांतील हिंदुजनतेचें राष्ट्रीय व सामाजिक शील बनविण्यास पुष्कळच प्रमाणानें कारणीभूत होत आहे त्या रामायणातील विशिष्ट व महत्वाची गोष्ट कोणती आहे ? ती गोष्ट ही आहे कीं, 'जरी जगांतील आपणास अगदर्दी नजीकची व प्रीय असलेली प्रत्येक वस्तू नष्ट होत असली, इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष स्वतःचा प्राणही नष्ट व्हावयाचा असला • तरी सत्य सोडावयाचें नाहीं; सत्याचा त्याग करावयाचा नाहीं, व सत्याकरिता प्रत्यक्ष स्वतःच्या प्राणासह कोणत्याही गोष्टीचा त्याग करावयाचा प्रसंग आला तरी माघार घ्यावयाची नाहीं; श्री रामचंद्राच्या राज्याभिषेक समयों विघ्न उपस्थित होऊन त्यास बनरास भोगावा लागणार, याबद्दल त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मण यांस वाईट वाटले व त्याने पित्याची वनवासास जाण्याची आज्ञा मान्य न करण्याबद्दल त्यास विनंती केली; तेव्हा राम त्यास म्हणांलाः-लक्ष्मणा, आपले वडील केवळ सत्यस्वरूप आहेत; त्यांचा शत्रु हेच सत्य आहे; आणि त्याचे प्रत्येक कृत्य सत्यास धरून आहे; परलोंकाची त्यांना भीती वाटते तरी ते त्या संबंधानें निर्भय असोत; संपत्ति गेली म्हणून तूं दुःखी होऊ नकोस; साम्राज्य व अरण्य हीं दोन्हीं मला सारखीच आहेत; आपण अरण्यांतही सुखाने राहूं " पुढ दशरथाच्या मृत्यूनंतर वृद्ध मंत्री जाबाली ऋषी याने रामास अयोध्येस परत येऊन राज्यसूत्र हात घेण्याबद्दल विनंती केली, तेव्हा राम त्यास म्हणाला:- जाबाले ! सत्य हैं मला सर्वांहून अधिक आहे. राज्याची इमारतच सत्याच्या पायावर रचिलेली अ.दे. सत्य है सर्व धर्माचे मूळ आहे. म्हणून लोभ, मोह, किंवा कोष, यांनां बळी पडून मी सत्य कधीही, डणार नाहीं, सत्य, व कर्तव्य कर्म,