पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/71

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे     प्रकरण तिसरें.     ६९

मनोरंजक असल्याकारणाने त्याचे विवेचन जरी मर्यादेच्या पलीकडे थोडेसे गेलें तरी सुज्ञ वाचक आम्हांवर रुष्ट होणार नाहींत अशी आम्हांस उमेद आहे.

 हिंदुस्तानांत येऊन वर सांगितलेल्या रीतीने जे लोक कायमचे वास्तव्य करून राहिले ते लोक पूर्वी एशिया-खंडाच्या मध्यभागांत राहत असत. तेथे त्यांच्या आसपास राहणारे जे लोक होते त्यांस “तुराणी" अथवा “त्युरेनियन" असे नांव असे. हा शब्द ज्या धातूपासून झाला आहे त्याच धातूपासून " त्वरा म्हणजे जलदी व “ तुरंगम" म्हणजे घोडा हेही शब्द झाले आहेत. ह्यावरून असे व्यक्त होते की, तुराणी लोक हे त्यांच्या शेजाऱ्यांपेक्षा कमी सुधारलेले असून, ते टोळ्यांटोळ्यांच्या रूपाने राहत असून त्यांचे कायमचे वास्तव्य एके ठिकाणी नसे. आज एका टोळीचा एके ठिकाणीं मुक्काम, कांही दिवसांनी दुसऱ्या ठिकाणीं ह्याप्रमाणे ते नेहमी स्थलांतर करीत असत. येणेप्रमाणे सदैव स्थलांतर करीत राहणारे लोक हे अगदी रानटी स्थितीच्या किंचित् वरचे होत व सुधारणेच्या दृष्टीने ह्या स्थितीच्या वरची स्थिति शेतकीवर चरितार्थ करून राहणाऱ्या लोकांची होय; कारण समाजघटना ही सृष्टिनियमाप्रमाणे उत्तरोत्तर स्थिरावत जाते व समाजवृद्धीमुळे कायमचे वास्तव्य एका जागी करून राहण्याची आवश्यकता उत्पन्न होते व तेणेकरून शेतकीकडे लोकांचे लक्ष्य लागते. शेतकीवर चरितार्थ करून राहणा-या लोकांची स्थिति सदैव भटकत राहणाऱ्या लोकांच्या स्थितीपेक्षां वरच्या पायरीची होय. असो, एशिया-खंडाच्या मध्यभागी राहणाऱ्या लोकांची चार हजार वर्षापूर्वी कशी समाजघटना होती, हे त्या लोकांचे वाचक शब्द आपणांस ठाऊक आहेत त्यावरून व्यक्त होते. तुराणी