पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/7

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे     उपोद्घात.     

असत, त्यांचे सांगाडे दगडांच्या गर्भामध्ये सांपडल्यामुळे त्यांच्यावर काळाचा विध्वंसक परिणाम न होतां आज मितीस उपलब्ध होतात त्या सांगाड्यांस आस्थिनें म्हणतात. हीं आस्थिनें त्या त्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या आकारांविषयीं, आकृतींविषयीं वगैरे जिज्ञासु व शोधक पंडितांस माहिती देतात, व हजारों वर्षांमागील भूतलाचा नकाशाच जणू काय त्याच्या विस्मित व आनंदित अशा अंतश्चक्षुपुढे पसरतात. आस्थिनांचे हे महत्त्व मनांत आणून आधुनिक पंडितांनी त्यांचेवर मोठमोठाले ग्रंथ रचले आहेत. सृष्टिशास्त्रज्ञास ज्याप्रमाणे हीं आस्थिनें त्याचप्रमाणे भाषाशास्त्रज्ञांस शब्द, होत. ह्या शब्दांपासून अन्यथादुर्मिळ अशी नानाविध माहिती समजते. जे लोक पंचत्वाप्रत पावून त्यांचे नांवगांवसुद्धां आजमितीस कोणास ठाऊक नाहीं, त्या लोकांचे आचार आणि विचार, कल्पना आणि हृद्गत, ईप्सित आणि आकांक्षित वगैरे हरएक गोष्टी त्यांच्या भाषेमधील शब्दांत दृग्गोचर होतात. त्या लोकांचे कवित्व त्यांच्या काव्यांतच आढळते असे नव्हे, तर ते एकएकट्या शब्दांतसुद्धा आढळते. त्यांचा इतिहास त्यांच्या बखरींतून आढळतो तसा तो एकएकट्या शब्दांतसुद्धा आढळतें. त्यांची नीतीही त्यांच्या धर्मग्रंथांत आढळते तशी ती शब्दांतसुद्धा आढळते. भाषेतील शब्दांच्या महत्त्वाविषयी व्हिट्नी ह्या नांवाच्या एका प्रसिद्ध अमेरिकन ग्रंथकाराने म्हटले आहे:-

 But language is also pregnant with information respecting races which lies quite beyond the reach of physical science: it bears within itself plain evidences of mental and moral character and capa-