पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे५२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

मराठींत पाणक्या किंवा आचारी असा अर्थ होतो. शागीर्द आणि शिष्या ह्या दोन्ही शब्दांचे एकाच कारणाने मातेरें होऊन हल्लीचा अर्थही दोघांचा एकच आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण, आचारी, भट इत्यादिकांचेही अर्थ अवनत झालेले आहेत ते वाचकांच्या नजरेस येण्याजोगे आहे. शब्दांस अवनत करणारी प्रापंचिक अवनति ब्राह्मण, शिष्या, आचारी, भट वगैरे शब्दांत दृष्टीस पडते. ह्याच प्रकारची दुसरी कांहीं उदाहरणे मागे आली आहेत ती वाचकांस आठवतीलच.

 चिरपरिचितत्वाच्या योगाने शब्दास अवनति प्राप्त होते असे आम्हीं मागे म्हटले आहे, त्याचा आतां खुलासेवार विचार करतो. |

 बीभत्स व ओंगळ वस्तूविषयी बोलण्याची मनुष्यास खंती असते, व ही खंती त्याला भूषणावहच होय. त्या वस्तूच्या विषयी त्याला बोलावयाचा प्रसंग आलाच तर तो त्या वस्तूचा दुरूनच निर्देश करतो, त्या वस्तूचा तो प्रत्यक्ष उच्चार करीत नाहीं. स्त्रियांच्या प्राथमिक रजःस्रावासंबंधाने बोलावयाचे असतां "रजःस्राव” किंवा “ऋतुदर्शन" हे शब्द घातले असतां बीभत्स वस्तूचे स्पष्ट वर्णन केले असे होते; म्हणून तिला “नाहाणे" आलें म्हणजे ठराविक समयीं स्नान करण्याचे दिवस आले असा अप्रत्यक्ष रीतीने विवक्षित वस्तूचा निर्देश करणारा "नहाण" हा शब्द प्रचारांत आला; परंतु पुढे ती बीभत्स वस्तु व तिचा वाचक “नहाण" हा शब्द ह्यांचे साततिक साहचर्य झाल्या कारणाने त्या बीभत्स वस्तूचा बीभसपणा "नहाण" ह्या शब्दास प्राप्त होऊन, तो शब्द आलिकडे प्रतिष्ठित संभाषणांत योजला जात नाही. त्याच्याबद्दल बायका "मुका मुलगा " व पुरुष " रजोदर्शन " असे म्हण-