Jump to content

पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





६) निस, दुस
 'अति' याच्या उलट निस् आणि 'सु' याच्या उलट दुस् चे अर्थ होतात. उदा. निर्धन, दुर्जन, दुःसह, दुस्तर, दुर्गति, निस् याने बाहेर असाही अर्थ दखविला जातो. उदा. 'अद्वय : निरौब्जत् किंवा निरधमत् ।' याचा अर्थ (वृत्तासुराला इंद्राने) पाण्यातून हुसाकावून लावले, बाहेर फेकून दिले. दुरित (दुस्+इत) म्हणजे संकट किंवा अकस्मात, दुर्गम म्हणजे जाण्यासाठी अवघड असा अर्थ होतो. वियोग अथवा अभाव असाही अर्थ होतो. उदा. निष्फल, निबंध, निस्तेज, निष्पाप, निःसंकोच, निरपराध (अत्यंत) निमग्न, निबंध, निजोर, (नकार) निष्कर्म.
७) नि, अव 'अव' म्हणजे कमीपणा उदा. अवलक्षण 'नि' आणि 'अव' हे उपसर्ग विनिग्रह हा अर्थ दाखवितात. विनिग्रह याचा अर्थ दाबून टाकणे. उदा. निगृह्णाति, अवगृह्णाति या दोन्हींचाही अर्थ दाबून टाकणे, कोंडून ठेवणे असाच होतो. निर्गुण, निकृष्ट, निराकारी, अवलक्षण : (या अर्थी) अवगणना, अवतरण, अवमान : (अभाव), अवकृपा, अवगुण, अवहेलना : म्हणजे पासून, खाली, पासून दूर, अवज्ञा : इ. दर्शक उपसर्ग आहेत.
८) उद् :
उद् गृहनाति म्हणजे बाहेर काढतो, मोकळे सोडतो उदेति म्हणजे बाहेर येतो. (सूर्य : उदेति) = सूर्य उगवतो, सूर्यघरातून बाहेर येतो उत् म्हणजे (उंच, वर) उत्कर्ष, उद्वाहन, उल्लंघन, उत्तीर्ण, उद्विज, उल्हास इत्यादी.
९) सम

'सम' याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. समेति म्हणजे एकत्र येतो (बरोबर);



४३...