Jump to content

पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





३) पुढे काही अशुद्ध वाक्ये शुद्धलेखनाच्या नियमानुसार लिहून दाखविली आहेत.
क) लिहीताना अनवधानाने एकादी चुक होणे वेगळे व पांच दहा चुका होणे वेगळे.
क) लिहितांना अनवधानाने एखादी चूक होणे वेगळे व पाच दहा चुका होणे वेगळे.
ख) सर्व विद्यार्थ्यांनी उद्या उपस्थित राहावे; महत्त्वाच्या सूचना द्यावयाच्या आहेत.
ख) सर्व विद्यार्थ्यांनी उद्या उपस्थित राहावे. महत्त्वाच्या सूचना द्यावयाच्या आहेत.
ग) हे असं बोलणं त्याने ऐकून घेतलं नसते.
ग) हे असे बोलणे त्याने ऐकून घेतले नसते.
घ) कर्मणूक, नितीमत्ता, क्रांतीवीर, काराग्रह हे मराठीतील काही शब्द होत.
घ) करमणूक, नीतिमत्ता, क्रांतिवीर, कारागृह हे मराठीतील काही शब्द होत.
ड) चिपळूणकरानी निबंधमाला सुरु केली.
ड)चिपळुणकरांनी 'निबंधमाला' सुरू केली.
च) अकस्मात् तिथं पूर्ववत् स्थीती निर्माण झाली.
च) अकस्मात तिथे पूर्ववत स्थिती निर्माण झाली.
छ) त्याचे मूळ गांव कोणचे ?
छ) त्याचे मूळ गाव कोणते ?
ज) वैजापूर. म्हणून तर वजापूरलाच हळुहळू त्याने जमिन-जुमला घेतला.
ज) “वैजापूर ! म्हणून तर वैजापुरलाच हळूहळू त्याने जमीन-जुमला घेतला."
४) विरामचिह्ने योग्य त्या ठिकाणी देऊन पुढील वाक्ये दिली आहेत.
क) आम्ही रोज महाविद्यालयात; जातो.
क) आम्ही रोज महाविद्यालयात जातो.
ख) मी काल तुमच्याकडे आले; होते पण भेट होऊ शकली नाही.

ख) “मी काल तुमच्याकडे आले होते; पण भेट होऊ शकली नाही".



३२...