पान:मराठी रंगभुमी.djvu/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५८
मराठी रंगभूमि.
शाहूनगरवासी मंडळी.

 बुकिश नाटकासंबंधाने सर्वांत चांगले नांव मिळविलेली नाटकमंडळी ह्मणजे 'शाहूनगरवासी' हीच होय. ही मंडळी पहिल्या प्रथम 'तागडथोम' नाटकेंच करीत असत. पण पुढे पुण्यास आल्यावर फर्ग्युसन कॉलेजांतील प्रोफेसर वासुदेवराव केळकर व रा. शंकर मोरो रानडे यांच्या साहायाने ही मंडळी बुकिश नाटकांचे प्रयोग करूं लागली; व यांच्या 'त्राटिका' नाटकाचा प्रयोग हल्ली लोकांस इतका कांहीं पसंत पडला आहे की, तो ज्या दिवशी लागतो त्या दिवशी नाटकगृह लोकांनी फुलून जाते. 'त्राटिका' हे नाटक शेक्सपियरच्या ‘टेमिंग ऑफ धी श्र्यू' या नाटकाच्या आधारें रचले असून तें 'नाट्यकथार्णव ' मासिक पुस्तकांतून प्रसिद्ध झाले आहे.यांत विनोद व हास्यरस पूर्ण आहे. रा. केळकर हे स्वतः विनोदी आणि थट्टेखोर असल्यामुळे त्राटिका नाटकांत त्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब सुरेख पडले आहे.असो; त्राटिका नाटकाची मुख्य बहार ह्मणजे त्राटिका, प्रतापराव व पिल्या या तीन पात्रांवर. त्राटिका ही हट्टी आणि कजाग बायको; प्रतापराव तिच्याशी लग्न करून तिला वठणीला आणणारा; आणि अशा कामांत पिल्यासारखा विनोदी आणि गमती चाकर त्याला मिळालेला; असें नाटकाचे संविधानक असून मूळ नाटकच रसभरीत आहे, त्यांतून पूर्वी