Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५०
मराठी रंगभूमि.

णिक नाटकांच्या वेळी बहुतेक पडद्यांवर देवादिकांचीं चित्रे काढली जात असत. त्यांतल्या त्यांत सर्वांत पुढच्या पडद्यावर गणपती, मारुती, अगर शंकरपार्वती अशां- पैकी एखादें चित्र असून रंगाच्या भपक्याखेरीज त्यांत कांहीं विशेष नसे व साधारणपणे तें ओबडधोबडच असे. पण बुकिश नाटकांच्या प्रयोगांत रस्ता, देऊळ, बाग, महाल, डोंगर, जंगल, नदी वगैरे निरनिराळ्या स्थलांची बरोबर कल्पना प्रेक्षकांच्या मनांत उतरून देण्याचा प्रयत्न होऊ लागल्यामुळे पडद्यांवर ती ती स्थले निघतील तितकी हुबेहुब काढू लागले. त्यांतून कांहीं कांहीं नाटके प्रस्तुत कालची स्थले, माणसें, प्रसंग वगैरेवर रचली असल्यामुळे व नव्या इंग्रजी पद्धतीने चित्र- कलेचे शिक्षण इकडील लोकांस मिळू लागल्यामुळे पडदे रंगविण्यांतही सुधारणा झाली; व मुंबईच्या सात सात मजली इमारती व रस्ते, आगगाडीच्या सडका, समुद्रां- तील बोटी आणि दिवे, घड्याळांचे उंच मनोरे, तारा- यंत्राचे खांब, गिरण्यांची धुराडी, वगैरे देखावे त्यांतून निघू लागले. पडद्यांच्या रुळांतही बराच फेरबदल झाला. पूर्वी मोठाल्या भरीव व दांडग्या रुळाभोवती पडदा गुंडळीत असत. पण पुढे पुढें तें काम अवजड वाटू लाग- ल्यामुळे पोकळ व हलके रूळ करण्यांत आले. देखावे दाखविण्याच्या कामांत तर फारच अंतर पडले. ह्मणजे बागेचा देखावा दाखवायाचा झाला तर पूर्वी पडद्यांवर