सोंग घेणारा इसम गुदमरून जाऊन त्याला बोलतां बोलतां धाप लागे. सरस्वतीचे सोंग घेणारे पात्र नेहमी लहान असून त्याचा आवाज बहुतकरून खणखणीत असे. मोरावर बसल्याची ऐट करून पुढे लांकडी मोर बांधावयाचा व मागें पिसारा खोवून देऊन जणूं काय मोर नाचत आहे असे दाखविण्याच्या हेतूने दोन्ही हातांत दोन हातरुमाल उडवीत हे पात्र आपल्याच पायावर नाचत असे; व नाचतां नाचतां त्याची अशी ताणपिट उडे की, सूत्रधाराने 'माते वंदन करितों' ह्मणून मटल्यावर त्याला 'सूत्रधारा, तुजप्रत कल्याण असो' हा आशीर्वाद धापेमुळे प्रत्येक शब्दावर मुक्काम केल्याखेरीज देतां येत नसे. असो; ही दोन्ही पात्र अज्ञ असून भाषण वगैरेंत जरी विसंगतपणा पुष्कळ असे तरी त्या वेळचा प्रेक्षकसमाज भाविक असून ती पद्धत ही विशेष प्रचारांत आल्यामुळे त्यांच्या कामाबद्दल गौरवच होत असे. गणपती व सरस्वतीखेरीज मारुती, रावण वगैरे पात्रांतही थोडासा लक्ष देण्यासारखा भाग असे. तो हा की, मारुतीचे शेपूट चिव्याची कांब लावून दहावीस हात मोठे करीत व त्याच्या भोंवतीं फडकी गुंडाळीत; व एवढे मोठे शेपूट उचलत नसे ह्मणून त्या पात्राच्या मदतीस आणखी दोन तीन इसम देत, व ते आंगापेक्षां शेंपटीचा बोंगा मोठा ठेवणाऱ्या मारुतीला अलाव्यांतील सोंगाप्रमाणे शेंपटीसह उचलून
पान:मराठी रंगभुमी.djvu/48
Appearance