Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/228

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९४
मराठी रंगभूमि.


अखेर मनुष्यास थकवा येऊन तो अगदीं निःशक्त होऊन जातो. करितां अशीं कामें कांहीं दिवस मध्यें टाकूनच केलीं पाहिजेत. शिवाय दररोज नाटकें करण्यानें द्रव्याची प्राप्तीही विशेष होते अशी गोष्ट नाहीं. कारण, रोज रोज नाटकें पाहून लोक कंटाळून गेले ह्मणजे पुढे नाटकास फारशी दाटी जमत नाहीं. अर्थात खर्चाच्या मानानें उत्पन्न होत नाहीं हें अनेक नाटकमंडळ्यांच्या प्रत्यंतरास आलें असेल.
 (११) पंचभेळ खिचडी ह्मणून या नाटकांतला एक अंक, त्या नाटकांतला एक अंक असे मिळून कांहीं भाग नाटकमंडळी लावीत असते. पण ' एक धड ना भाराभर चिंध्या ' अशांतला तो प्रकार होऊन त्यापासून बोध किंवा करमणूक मुळींच होत नाहीं. करितां नाटकमंडळींनें सहसा अशा प्रकारचा खेळ लावू नये.
 ( १२) नाटकांतील इसमांनीं आपापसांत कलह करून एकमेकांचीं मनें कधीही कलुषित करू नयेत. त्यायोगानें प्रयेागाला रंग चढ़त नाहीं. समजा, प्रयोगाचे वेळीं नायक व नायिका होणा-या पात्रांत प्रेम उत्पन्न होऊन त्यांची प्रीति जडावयाची असली किंवा अशाच प्रकारचे प्रीति, एकी, सहानुभूति, निष्कपट, आदरबुद्धि इत्यादिकांचें प्रदर्शन करावयाचें झालें तर पात्रांची तादात्म्यवृत्ति झाल्याशियाय तें होणार नाही; व अशा वेळीं खासगी द्वेष किंवा मत्सर नसून एकमकांचीं मनें एक-