पान:मराठी रंगभुमी.djvu/224

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९०
मराठी रंगभूमि.


मानें एकदां आम्हांस असें सांगितलें कीं, आपल्या हातांत नकली तरवार दिली तर आपण सुमेरसिंग आहों असें वाटतच नाहीं. तीच खरी तरवार दिली तर तादात्म्य होऊन तें काम फार हुरूपीनें होतें. हा तरवारीचा प्रश्न आहे व तो हल्लींच्या कायद्याखालीं येणारा असल्यामुळें आह्मी त्याबद्दल आग्रह करीत नाहीं व आमच्या आग्रहाचा कांहीं उपयोगही होणार नाहीं. खेरीज नाटकांत सुद्धां खरी तरवार वापरण्या इतकें शैौर्य हलींच्या काळीं सर्वात असेल किंवा नाहीं याची वानवाच आहे ! असें आहे तरी इच्छा असल्यास हीही वस्तु कोणा कोणास परवानगीनें वापरण्यास मिळेल व तशी मिळाल्यास तिचा नाटकांत उपयोग करून घ्यावा. पण याखेरीज सहजी मिळणा-या इतर ज्या कित्येक खेोट्या वस्तु पुढे आणतात त्या तरी ख-या आणण्याविषयीं त्यांनों खबरदारी ध्यावी,
 (६) नाटकास रंग चढण्यास नाटकमंडळींत भूमिका करणारे निरनिराळे इसम पाहिजेत. एकाच इसमानें एकाच नाटकांत अनेक भूमिका घेतल्यानें त्या त्या भूमिकांचे वजन पडत नाहीं. आतां अनेक भूमिका करण्यांत केित्येक पात्रें वाकबगार असतात व सोंग बदलून आल्यावर् पुष्कळ वेळपर्यंत तीं ओळखतही नसतात. पण लोकांना केव्हांना केव्हां तरी तें उमगल्याशिवाय राहत नाहीं; व असें उमगलें ह्मणजे त्या पात्राच्या चालू व