पान:मराठी रंगभुमी.djvu/222

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८८
मराठी रंगभूमि.


बेरंग झाल्याचें दृष्टोत्पत्तीस आलें आहे. कित्येक पात्रांना चांगले चांगले पोषाख वापरण्याची उगीच संवय लागलेली असते, त्यामुळे दासीच्या गळ्यांत केव्हां केव्हां मोत्याचे कंठे असतात आणि मालकिणीस धड मंगळसूत्रही असत नाहीं. तसेंच चाकर जरीकाठी पटका डोकीस गुंडाळतो आणि मालकाच्या डोक्यास फाटकतुट्कीच बत्ती असते. कित्येक पात्रं वेळकाळ न पाहतां पायांत चढाव आणि स्टॉकिंग घालून रंगभूमीवर येतात; व कित्येक वेळीं अवेळीं चष्मे घालून आणि बूट पाट लोण चढवून येतात. अशा प्रकारच्या अयोग्य पोषाखानें त्या त्या व्यक्तीची किंमत कमी होऊन ते ते प्रसंगही परिणामकारक होत नाहींत.
 (५) पोषाख व इतर सामान जितकें खरें असेल तितकी नाटकास रंग अधिक चढतो हें ही नाटकवाल्यांनीं लक्षांत ठेवून शक्य तितकें खरें सामान वापरण्याची खबरदारी घ्यावी. 'ही यःकश्वित व किरकोळ बाब आहे. असें ह्मणून अनेक प्रसंगीं नाटककार अनेक गोष्टींची हेळसांड करितात; पण तें चुकीचें आहे. ' महत्कार्याची लहानसान गोष्टींनीच पूर्णता होतें ' असा एक नियम आहे तो त्यांनीं कधीही विसरतां कामा नये.* याचीं


 * ' लहानसान गोष्टींनीच पूर्णता होते. याविषयीं एक इंग्रजी पुस्तकांत विनोदपर एक लहान चुटका दिला आहे तो मजे

( १८९ पृष्ठ पहा. )