पान:मराठी रंगभुमी.djvu/220

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
मराठी रंगभूमि.


करतां येणें कठिण आहे व ह्मणून पात्रांनीं त्यांचा अभ्यास केला पाहिजे.*

 (३) नाटकांतील पात्रांचे ठायीं समयस्फूर्ति हा एक मुख्य गुण असला पाहिजे. तो नसेल तर पुष्कळ वेळां फजिती उडते. एकाद्या मनुष्याचें मूळ नाटकांत लठ्ठ म्हणून वर्णन केलें असतें, पण त्यावचें सोंग करणारा इसम रंगभूमीवर आला तर तो किडकिडीतच असतो, व त्याच्याशीं लठ्ठपणाचें उदाहरण घेऊनच दुसरा मनुष्य बोलत असतॊ. एखाद्या मनुष्याच्या डोकीवर् ऐटदार पगडी आहे असें नाटकांत वर्णन असतें, पण सोंग करणा-या इसमास घाई झाल्यामुळें तो डोकीवर टोपी ठेवूनच आलेला असतो. अशा स्थितींत त्याकडे लक्ष न देतां दुसरा इसम त्याच्या पगडीचें वर्णन करितो. अशा प्रकारें हातांत आंगठी नसतां आंगठी आहे असें समजूनू, गळ्यांत कंठ नसता कंठा आहे असें समजून किती तरी भाषणें चुकीचीं हो-


 * अभिनय शिकण्याकरितां विलायतेंतील लोक काय काय तरी प्रयत्न करीत असतात ! नुकतेंच कलकत्याच्या ' वेगवासी ' नामक पत्रामध्यें तिकडील प्रख्यात नट सर हेनरी आराविंग यांच्याविषयीं अशी हकीकत दिली होती कीं, दहे गृहस्थ ह्यातारे झाले असून त्यांना अद्याप अभेिनय करण्याची फार हौस आहे. तो इतकी कीं, गोळी लागून मनुष्य कसा मरतो हें दाखविण्याच्या उद्देशानें तसला देखावा पाहण्याकरितां स्वारी मुद्दाम टिऱ्हा लढाईत गेली होती व परत आल्यावर त्युाचा हुबेहुब नक्कल करून त्यांनी लोकांना अगदीं थक्क करून सोडिलें. यांनीं अभिनयावर कमींत कमी एक लाख रुपये मिळविले असें ह्मणतात !