पात्रांचे स्वभाव कसे वठवावेत, नाटक भारदस्त आणि परिणामकारक कसें करावें इ. गोष्टी उपजत येत नसतात. त्याकरितां अध्ययनच केलें पाहिजे, व असें जो अध्ययन करितो तोच त्या कलेंत पुढे येतो. असो; ही कला शिकून नाटके लिहिणारे लोक फार थोडे आहेत. ते जास्त निपजतील अशाविषयीं आमच्या सुशिक्षित पुढाऱ्यांनीं काळजी घ्यावी.
अलीकडे ऐतिहासिक नाटकें बरीच होऊं लागलीं आहेत व 'श्री. नारायणराव पेशवे यांचा वध,' 'बाजीराव आणि मस्तानी' 'पानपतचा मुकाबला' वगैरे नाटकें आज कैक दिवस रंगभूमीवरही येत आहेत. ही नाटकें जितकीं शुद्ध असतील तितकीं चांगलीं असें आह्मांस वाटतें. शुद्ध याचा अर्थ त्यांतील संविधनाक व रचना हीं ऐतिहासिक सत्यास सुटून असतां उपयोगी नाहींत. वरील नाटकांत ऐतिहासिक सत्यास सोडून बरेच प्रसंग घातलेले आहेत व तशाच तऱ्हेचे प्रसंग इतर नाटकांतूनही पुष्कळ आहेत. ऐतिहासिक सत्याप्रमाणें व्यक्तींचे स्वभाव बखरीतून किंवा खऱ्या इतिहासांतून वर्णन केलेले असतील तसेच ठेवले पाहिजेत; व त्यांचा परिपोष होईल अशी त्यांची वागणूक, भाषणें व कृति ठेविली पाहिजे. तसेंच त्यांचा स्वभाव खुलून दिसेल असेंच त्यांच्याशीं