Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/210

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७६
मराठी रंगभूमि.


मनावर खास चांगल्या रीतीनें बसेल अशी आमची समजूत आहे. अशा रीतीनें पौराणिक नाटकें तयार झालीं तर त्यापासून दुसरा असा फायदा होईल कीं, प्राचीन इतिहास चांगल्या रीतीनें अवगत होऊन आमच्या प्राचीन धर्माची आणि समाजाची स्थिति यांचें चांगलं ज्ञान होईल, या सूचनेकडे लेखक व नाटककार लक्ष देतील अशी आह्मांस आशा आहे.*

बुकिश नाटकांविषयीं हलगर्जीपणा.

 संगीत नाटकें झाल्यापासून नाटकेंही फारशीं होत नहींत, व हल्लीं बुकेिश नाटकें करणारी जी एक मंडळी आहे ती ‘ शाहुनगरवासी ' हीच होय. लोकांत चैन आणि करमणूक जसजशी वाढत चालली तसतशी ती पूर्ण करणा-या सगीत नाटकमंडळ्या अस्तित्वांत येऊं लागल्या; व आतां तर या कंपन्या इतक्या झाल्या आहेत किं, एकाच शहरांत एकाच रात्रीं अशा पांच चार


 * रा. वामन हरि वाड कुलाबा जिल्ह्यांतील एक शिक्षक यांनी कै. विष्णुपंत भावे यांच्या स्मारकार्थ ह्मणून १९° ? सालांत " जयद्रथवध " नांवाचें एक पौराणिक नाटक लिहिलें आहे. हें सर्वस्वी जरी अलीकडील बुकिश नाटकाच्या धर्तीवर नाहीं, तथापि भाषा व रचना यासंबंधानें पूर्वीच्या पद्धतींत सुधारणा करून व जेथे प्रयोगाचें चांगलें साहित्य नसतें अशा खेड्यापाड्यांतून सुद्धां त्याचा प्रयोग करितां यावा अशा बस्तानानें लिहिलेलें आहे. अलीकडे दहावीस वर्षीत पौराणिक नाटकें लिहिण्याकडे लोकांची मुळींच प्रवृत्ति नाहीं, तेव्हां अशा स्थितींत सदर नाटककर्त्याचा गौरव करणें आह्मांस उचित दिसतें.