Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भाग १ ला.

नकला करीत तशा गोंधळांत करीत नसत हें खरें आहे, तरी एकंदरींत आरंभीं घातलेल्या साध्या पोषाखानेंच पुढे येऊन बोलणें चालणें वगैरेंत एखाद्याची नकल हुबेहूब वठवून देत. लळिताहून तमाशे आणि गोंधळ यांचा प्रकार किंचित् भिन्न आहे. लळितांत बहुतकरून पौराणिक कथेवर खेळ करून दाखवीत. तमाशांत व गोंधळांत साधारणपणें त्या त्या वेळच्या स्थितीवर व माणसांवर कवनें करून बतावणी करीत असत. निजामच्या दरबारांत एकदां तमाशा होऊन त्यांत सवाई माधवराव व नानाफडणीस यांचीं सोंगें आणल्याचें इतिहासांत प्रसिद्धच आहे. रामजोशी यांनीं पेंढा-याच्या बंडावर पोवाडा केला असून तो तमाशांत ह्मणत असत; व मार्गे पुण्यास पाटसकर सावजी मलाप्पा यांची जी लळीतवाली मंडळी आली होती त्यांत रामा ह्मणून जो एक गोंधळी होता त्याची उत्कृष्ट ऐतिहासिक पोवाडे ह्मणण्याबद्दलची फार ख्याती आहे.*
 लळीतवाले, तमासगीर व गोंधळी यांच्याप्रमाणें बहुरूपी यांनींही नाटकाचा पाया रचण्यास बरीच मदत केली आहे. रोज नवीं सोंगें आणून त्यांची बेमालूम रीतीनें बतावणी करणारे बहुरूपी आजपर्यंत किती तरी होऊन गेले. त्याचप्रमाणें 'अमका हांसत नाहीं काय ?'


 * शं. तु. शाळिग्राम यांचें पोवाड्यांचें पुस्तक. पहिली आवृत्ति-प्रस्तावना.