पौराणिक नाटकें कोणत्या धर्तीवर करावीं ?--बुकिश नाटकांविषयीं हलगर्जीपणा--ऐतिहासिक नाटकांत सुधारणा ' उत्तेजन--नाट्यकलेची आस्ते आस्ते सुधारणा झाली पाहिजे बुकिश व संगीत नाटकें परिणामकारक होण्याचे सामान्य नियम -संगीत नाटकांसंबंधानें विशेष सूचना --चालकांची अंतर्बाह्य व्यवस्था --नाटकांत स्त्रिया असण्यापासून फायदे व तोटे-- हल्लींच्या संगीत नाटकांचें पर्यवसान--लोकाभिरुचि कोणी बिघडविली ?--नाट्यकला सुधारण्यास कोणी कसें साहाय केलें पाहिजे?--जाहिराती व हस्तपत्रकांत सुधारणा-नाटकगृहें कशी असावीं ?--नाट्यकलेसंबंधानें विद्वानांचे विचार.
बुकेिश नाटकें रंगभूमीवर होऊँ लागल्यापासून पौराणिक नाटकें मागें पडलीं, व आतां क्कचित् प्रसंगींच तीं पाहण्यास मिळतात. पाैराणिक नाटकें नावडतीं होण्यास मुख्य कारण त्यांतील धांगडधिंगा होय. हा धांगडधिंगा कमी करून बुकेिश नाटकांच्या धर्तीवर जर त्यांची रचना केली तर तीं लोकप्रिय होतील. आमच्या मतें भारत, भागवत व रामायण या ग्रंथांतून जे कथाभाग वर्णिले आहेत त्यांच्या इतके सरस कथाभाग दुसरीकडे मिळणें मुष्किल आहे. कपट, राज्यकारस्थान, शाैर्य, नीति इ. गोष्टींचा प्रेक्षकांच्या मनावर उत्तम ठसा उमटविण्याइतके वरील ग्रंथांत जितके प्रसंग आहेत तितके दुसरी