थोडाबहुत भव्यपणा येतो तो यांच्याच अभिनयामुळें येतो यांत कांहीं संशय नाहीं. अभिनयाप्रमाणें हे गाण्यांत वाकबगार नाहीत व ह्मणून त्यांना घातलेलीं पद्यें गाळलीं तर कांहीं वावगें होणार नाहीं. पण हें संगीत नाटक ना ? त्यांत घरी दारी, उठतां बसतां, ह्मणावयाला येवो न येवो, सरसकट सगळ्यांना गाणें नाहीं घातलें तर चालेल कसें ? असो; धाकटा चंद्रहास व इतर लहान मुलें यांचीं कामें बरी होतात. अविवेकाचें काम अविवेकानें होऊन शोक व करुणरसाचे वेळीं अभिनयानें व लघळपणानें हास्यरस उत्पन्न करून रंगाचा बेरंग करितो. या बेरंगांत मांगही आपल्या फाजल भाषणांनीं आणखी थोडी भर टाकतात. शारदा नाटकांत ' ह्यातारा इतका न अवघं ' हें पद्य ह्मणतांना मुलीनें केलेला अभिनय लोकांस प्रिय वाटतो ह्मणून तसलेंच अनुकरण या नाटकांत करणयाचें कांहीं प्रयोजन नव्हतें. त्यानें उष्ट्या कल्पनेचा दोष ग्रंथकर्त्यावर येऊन एकाच नाटकांत असला अभिनय असल्यानें त्याची जी लज्जत रहावयाची ती नाहींशी होते. असो; असले दोष अनेक असून ते सर्व येथें दाखवितां येणें अशक्य आहे.* एकंदरींत हेंही नाटक ह्मणण्यासारखे चांगलें झालें नसून प्रयोगही व्हावा तितका भारदस्त होत नाहीं.
* ता. ७ सप्टंबर १९०३ च्या सुधारकांत ' निस्पृही' या सहीनें लेख लिहिणा-या कोणी मार्मिक गृह्स्थाने या नाटकांतील