नाहींशी झाली, व आण्णांच्या पाठीमागें किर्लोस्कर मंडळीवर संकटाचा हा दुसरा मोठा घाला येऊन पडला. तथापि, त्यांतूनही निभावून तिनें आपलें डोकें पुन्हां वर काढलें. येथून या कंपनीच्या इतिहासाच्या तिसऱ्या भागास सुरवात झाली. ती हकीकत क्रमाक्रमानें पुढें येईल.
या वेळीं संगीत नाटकाची लोकांस फार चटक लागून 'माणिकप्रभुप्रासादिक,' 'नाट्यकलाप्रवर्तक,' 'स्वदेश हितचिंतक,' 'गोंवा संगीत मंडळी,' 'वाशिमकर,' 'आर्यसंगीतोत्तेजक,' 'क्षत्रियभूषण संगीत मंडळी' वगैरे अनेक कंपन्या अस्तित्वांत आल्या. या कंपन्यापैकीं बहुतेक सर्व कंपन्या पाटणकरी नाटकांच्या धर्तीवर नाटकें करणाऱ्या होत्या; व त्यांच्या पार्शीं चालींच्या पद्यांवर व 'हा मदंगा' सारख्या झगड्यांवर लोक लुब्ध झाल्यामुळे किर्लोस्करी नाटकें मागें पडलीं, व आतां तर किर्लोस्करी नाटकांतील स्वारस्य जाणणारा प्रेक्षकसमूह दुर्मिळ झाला आहे, व त्या नाटकांतील पद्यांच्या मोहक चालींची अभिरुचि उत्पन्न करणारीं पात्रे त्याहूनही दुर्मिळ झालीं आहेत. असो; वरील कंपन्यांपैकीं एक दोन कंपन्यांनीं
आपल्या आवाजीस कसून त्यांनीं तीस ताब्यांत ठेविलेंच होतें; पण त्यांत जें माधुर्य होतें ती पुष्कळांशीं ईश्वरदत देणगीचं ह्मटली पाहिजे. मरणसमयीं यांचें वय ३८ वर्षांचें होतें.