पंडित यांचे खटपटीमुळें कोणी आण्णासाहेब गोखले यांची बालविधवा कन्या रमा इचा पुनर्विवाह कोणी नारोपंत परांजपे या नांवाच्या विधुराशीं झाला आहे एवढी कायती या नाटकांतील मुख्य गोष्ट.” यांत विष्णुशास्त्री पंडित यांचें पात्र खरें घातलें असून बाकीचीं सर्व पात्रं कल्पित आहेत. कै. पंडित यांनीं पुनर्विवाह केल्यापासून त्या विवाहासंबंधानें लोकांत पुष्कळ चळवळ उडाली होती; व विधायक आणि निषेधक पक्षांमध्यें कडाक्याचे वाद सुरू झाले होते. या वादांचा यांत समावेश केल्यामुळे नाटकास कांहीं वेळ स्थानिक स्वरूप प्राप्त झालें हेातें. पण वरील कंपनीनें या नाटकाचे प्रयेाग केल्यावर पुढें त्याचे फारसे प्रयोग कोणी केले नाहींत. असो; शारदा नाटकांतील संविधानक थोडक्यांत असें आहे कीं, " भुजंगनाथ नांवाच्या विवाहास उत्सुक झालेल्या एका म्हाताऱ्या गृहस्थाचा भद्रेश्वर दीक्षिताच्या मध्यस्थीनें धनलोभी कांचनभटाच्या शारदा नामक उपवर कन्येशीं विवाह हेातो. हा वृद्धतरुणीविवाह होऊं नये ह्मणून श्रीमच्छंकराचार्यांचा कोदंड नांवाचा शिष्य खटपट करितो, व अखेर मंगलाष्टकें होऊन अक्षता पडल्यावर सप्पतदी होण्यापूर्वीच सगोत्रविवाह असें सांगून ती मोडून टाकितो. पुढें शारदा आपली फजिती झाली ह्मणून जीव देण्याच्या उद्देशानें नदीच्या कांठीं उभी राहिली असतां ऐन उडी टाकण्याच्या वेळीं अविवाहित
पान:मराठी रंगभुमी.djvu/158
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४०
मराठी रंगभूमि.