पान:मराठी रंगभुमी.djvu/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३७
भाग २ रा.


केिलोंस्कर कंपनींत फेरफार.

 रा० नाटेकर व मोरोबा वाघूलीकर हे निघून गेल्यावर केिलोंस्कर कंपानीचा सव बोजा एकट्या भाऊरावावरच पडला हें मागें सांगितलेंच आहे. या वेळीं भाऊ रावांनीं स्त्रीपार्ट करावयाचें सोडून देऊन ते पुरुषपार्ट घेऊ लागले, व नवीन पात्रें जमा करून ते नवीन नवीन नाटकें बसवू लागले. ' नाटयानंद ' कंपनीनें मृच्छकटिक नाटकाची गोडी लोकांस लावून दिली असल्यामुळे व तें नाटकही सरस असल्यामुळें या कंपनीने तें हातीं घेतलें, व चारुदत्ताचें काम खुद्द भाऊराव हेच करू लागले. भाऊरावांचें स्त्रांपाटीचें काम ज्याच्या डोळ्यात बसलें होतें त्याना प्रथ


नाहींत अँ ? रडा तर आतां, हे आधुनिक कविशिरोमणी, पायांस नाल मारून तुमच्या ठतीस तुडवीत आहत तें पट्टा निमूटपणें ! तुक्या वाणगटया, तुझी कविता अभंग कशी ती पाहतें, मोन्या, वामन्या, तुन चीं तीं यमकें व शब्दचमत्कृति कशीं ती पाहतें, रंग्या, शिन्या, तुमच मिठीं भापणें कोटें राहृतात तीं पाहतें आणि तूं रे कोण, शेक्सपियर कां कोणू मसण्या, मेल्या तुझ्या नाटकांच्या चिधाड्या उडविण्यास माझे लेक लागले आहेत समजलास ? शिखानष्टा तुझी मूठभर दाढी माझे हातीं सांपडली आहे आतां कोठं जातोस ! तुझ्या दृाम्लेटाच्या बापाच्या पिशाच्याप्रमाणें पुनः स्वतः जगांत येऊन आपला चेला तयार करज्याच्या आधींच तुझ्या द्वाम्लेटास पेटीच्या सुरांत गायास लाविते व.त्याच्या पिशाच झालेल्या बाष्पास ठेका धरावयास लार्वान तरच नांवची समजलास ! आणि तुझ्या डेस्डिमोनेचें नरडे दाबल्यावर तिचा प्राण जाण्यापूर्वी तिच्याकडून एक बहारीची ठुमरी ह्मणवीन तरच स्तरीं समजलास ! इ० इ०.