धीट यांचें नयो वीट साचा हरी । " हा यमक्या माझ्यापुढें सुद्धां आणु नका. " सिंहासनीं बैसेल रघुविर छत्र सुधवलांबरीं । द्यावें सेमित्राच्या करीं ॥ असल्या नेभळ्या आज्ञा देत जाऊं नका. ' ह्राणा मारा चोपा झोडा, सत्वरि धाडा यमसदना ॥ अशा टुड़की चालाच्या आज्ञा चालत जाऊं या. सारांश, थोडक्यांत सांगतें, निजतांना, जेवतांना, बोलतांना, एकमेकांचा खून करतांना, कवितेशिवाय व पेटीतबल्याशिवाय बोळू नका ! सर्व व्यवहार संगीत चालू द्या! मरतांना संगीत, प्राणोत्क्रमण होत असतां देखील तबला पाहिजे बरें ! तुळशीपत्रे व गीतागंगेोदक नसंलीं तरी टूरकत नाहीं ! मरतांना तान मात्र चुकू नका. कवित्व करण्याच्या हृजारों नियमांच्या तीनच जातो. तेवढया मनांत वागवा. एक “ वड्यांची कविता, " " विटाळ्याची " व तिसरी “ कोंदणाची. " याच तीन जाती तुह्मांस तीन प्रसंगीं उपयोगी पडतील. " वड्यांची कविता " ह्मणजे, ताटांत घट्ट कलेला पाक ओतून मग त्याच्या जशा ढ्व्या तशा वड्या पडतात, त्याप्रमाणें प्रथम साधं गद्य लिट्टा. उदाहरणार्थ, “प्रधानाच्या घरीं जाया निघाले मी पट्टा आतां " यामध्यें दोन दोन रेघा मारीत जा व-काय चमत्कार होतो तो अवलोकन करा. प्रधानाच्या ॥ घरी जाया ॥ निघालं मी ॥ पद्दा आतां ॥ कां ! कशी झाली ही वड्यांची कविता ! तसेंच विटा पाडण्याचें विटाळे घेऊन त्यांत मानी गच भद्धन विटाळें उचललें कीं पडली खालीं वीट ! तसें वर एक वृत्त देऊन त्यांत मग काढा भरून शब्द कीं ड्रल विटाळ्याची कविता. उदाहरण, [जगत्कांता] रि एकाकी प्रिया माझी ॥ या ठिकाणीं विटाळ्यांत ' जगत्कान्ता' राहिली रेि रा. हिना, तर काढली बाहेर ! अडून बसू नका. तिसरी कोंदणाची ऋविता त्नणजे प्राचीन अथवा अर्वाचीन कवीचें मळ पद्य घेऊन त्यांत नांवें बदलायची. “माझा भरत देखिला काय, कुणि तरी सांगा ट्रेो ” यांतील भरत चिमट्यानें उपटून काढा व त्या ठिकाणीं कृष्ण, राम अथवा प्रसंगीं प्रिया बसवून कविता बनवा.