Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६१
भाग ३ रा.


आहे,पण रोग्याला तें कधीं विषाप्रमाणे घातक होतें, ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे. आपल्या देशांत गायनाची जी योग्यता मानिली आहे , तीपेक्षांही प्राचीन ग्रीक लोकांत ती अधिक मानली जात होती. परंतु तेथे सुद्धां या कलेचा दुरुपयोग न होऊ देण्याविषयी काळजी घेत असत. जगन्मान्य तत्ववेत्ता प्लेटो याने एके ठिकाणी झटले आहेज्यांचेकडे स्वदेश- हिताची जबाबदारी आहेत्यांनी संगीतावर सक्त नजर ठेविली पाहिजे. कारण मर्यादेचे अथवा कायद्याचें उल्लंघन कोणाचेही लक्षांत न येतां करमणुकीच्या रूपाने प्रथमतः या संगीताचे द्वारानें होऊं लागतं. अमर्यादपणा अथवा उच्छंखलपणा यांचा या द्वारानें मनांत प्रथम शिरकाब होतो, आणि मग हळूहळू रीतभात व वागणूक यांतही त्याचे परिणाम दृष्टीस पडू लागतात. " प्लेटोच्या या उद्रारांत पुष्कळ सत्यता आहे हैं अनुभवास येऊं लागलें आहे. अप्रबुद्ध व अल्पवयस्क मुलांचे मनांची प्रवृत्ति शृंगाराकडे होऊ लागली आहेश्रृंगारविषयक पथं गुंगण्याचा नाद् लागल्यापासून मुलांच्या मनावर व शरीरावर अनिष्ट परिणाम घडल्यावांचुन राहणार नाही. या गोष्टीचा मार्मिक व सुज्ञ ग्रंथ कारांनीं व आमच्या लोकनायकांनीं अवश्य विचार करावा, अश माझी त्यांस सविनय खुचना . श्रीखंड उत्तम पक्वान्न आहे परंतु त्यांत माजूम कालवून त्याच्या वड्या विकास मांडू नयेत. माजूमच ज्याला खावयाची असेल त्याला ती कोठेंही मिळेल; परंतु आमच्यांत जे संगीत नाटकें हल्लीं रचीत आहेत, त्यांनी संगीतरूप श्रीखंडांत भत्स श्रृंगाररूप माजूम मिश्रित केली असतां, स्वदेशाची मोठी हानि केल्याचे पातक त्यांच्या माथीं येईल हें त्वांनीं लक्षांत ठेवावें. “ इंदुप्रकाश, २८।९।०३ .