नाटकमंडळींनी नायकिणीच्या गाण्याच्या भपक्यावर पैसे मिळविण्याइतकी आमच्यांतील नाट्यकला खचित नच नाहीं! पण
या मंडळीने तिला या दशेला आणून पोहोंचविलें त्याला काय
इलाज ? नाटक हें संसाराचे चित्र आहे, त्यापासून मनोरंजन
होऊन बोधही घेतां येतो. असें असतां असली मंडळी तिला भलताच वेष देऊं लागली, तर लोकांना त्याबद्दल तिरस्कार उत्पन्न
होऊन त्यांनी ‘ नाटकवाले तितके हलकट' असा शेरा मारल्यास
त्याविषयीं नाटकवाल्यांनीं विषाद कां बरें मानावा ?
तात्पर्य, अशा प्रकारची नाटकें सभ्य स्त्रीपुरुषांना
पाहण्यास अयोग्य असून त्याचा समाजावर अनिष्ट
परिणाम होत आहे. करितां याचा प्रतिकार अवश्य
झाला पाहिजे.
वरील विवेचनावरून लोकाभिरुचि कोणी बिघडविली हे वाचकांना सहज कळून येईल. ‘आी काय करावें ? लोकांना अशा प्रकारची नाटकें आवडतात म्हणून तीं आम्ही करतो,' अशा प्रकारचे समर्थन अली कडील कित्येक संगीत नाटकमंडळ्यांचे चालक करीत असतात. पण आम्ही त्यांना असें विचारतों कीं, ’ वरील प्रकारचीं बीभत्स व तमाशेवजा नाटकी करण्यांविषयी लोकांनी तुम्हांस कधीं आग्रह केला होता काय ? किंवा अशा नाटकांशिवाय आमचे अगदी अडलें आहे तेव्हां कसेंही करून ती करा असें म्हणून आपल्या तर्फ डेप्यु टेशन पाठवून त्यांनी कधीं विनंति केली होती काय ? °