Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१२
मराठी रंगभूमि.


जी एक स्त्री आहे ती केव्हां केव्हा जें अभिमन्यूचें काम करून दाखविते ते पुष्कळांना पसंतही पडलें आहे

हल्लींच्या संगीत नाटकांचे पर्यवसान.

 हल्लींच्या संगीत नाटकांकडे जो कोणी सूक्ष्म दृष्टीनें अवलोकन करील त्याला या नाटकांपासून लोकांच्या मनावर नीतीचा किंवा उच्च मनोवृत्तींचा ठसा न उमटता शृंगाराचा ठसा जास्त उमटतो असे दिसून येईल. पूर्वी च्या नाटकांत श्रृंगार नव्हता असे नाही; पण तो प्रौढ असून नाटकाची व प्रयोगाची एकंदर रचना अशा रीतीची असे की, त्याचा प्रेक्षकांच्या मनावर अनिष्ट परिणाम न होतां उलट त्यापासून उच्च मनोवृत्ति जागृत होत असत. आली म्हणतों याची उदाहरणे शोधण्यास फार लांब जावयास नको. कालिदास, भवभूति किंवा शूद्रक अशांसारख्या महाकवींच्या नाटकांचे जे पहिल्यानें संगीतांत प्रयोग झाले किंवा अजूनही कोठें कोठें होतात तेच या म्हणण्याची साक्ष देतील. हल्लीच्या बहुतेक नाटक कांत उत्तान श्रृंगार जास्त असून प्रयोगाचे वेळींही पात्रां कडून अशा प्रकारचा अभिनये होत असतो कीं, त पाहून प्रेक्षकांचे मन श्रृंगाररसांतच दंग होऊन जाते. नाटकांतील प्रसंग कसलाही असो, व नायकनायूि कादि करून पार्ने कोणत्याही दर्जाचीं व स्वभावाचा असोत, स्त्री व पुरुष यांची गांठ रंगभूमीवर पडली कीं, त्यांनी 'हा मंदंगाचा' धिंगाणा घालून प्रेक्षकांची