Jump to content

पान:मराठी भाषेचे वाक्प्रचार, म्हणी, इत्यादि.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. -*- ह्या पुस्तकाचा उद्देश व त्यांतील विषय यांचे दिग्दर्शन प्रकाशकांनी केल आहे, त्याची पुनरुक्ति करण्याचें कारण नाहीं. आम्ही इतकेंच म्हणतों कीं, मराठी भाषेचे संप्रदाय, म्हणी, इत्यादिकांचें शास्त्रीय पद्धतीनें आणि मोठ्या प्रमाणावर वर्गीकरण आणि निरूपण करणें, हें भिन्न भिन्न प्रांतांत राहाणाऱ्या अनेक विद्वानांच्या मंडळीचें काम आहे, आम्हासारख्या एकट्या दुकटया व केवळ लिहिण्याची हौस असलेल्या माणसाचें काम नव्हे. तथापि प्रकाश- कांचा फार आग्रह पडल्यावरून आम्ही हे काम पथकरिलें आणि पुढील ग्रंथ रचिला. यांतील विषयाची मांडणी धोपट मार्गाची आणि निरूपण त्रोटक रतिचि आहे, तथापि तेवढ्यानेही विद्यार्थ्यांची बरीच सोय होईल अशी उमेद आहे. मराठी भाषेचें गद्य वाङ्मय अगदी थोडें आहे, त्यामुळे संप्रदाय, म्हणी, वगै- रेंच्या अर्थासंबंधाने व उपयोगासंबंधानें साहजिकपणें भतभेद असावयाचाच. आम्हास जो उपयोग अधिक ग्राह्य, व जो अर्थ अधिक शुद्ध, वाटला, तोच उपयोग व तोच अर्थ देण्याविषयी आम्हीं खबरदारी घेतली आहे. तथापि ह्या बाब- तीत आमचे हातून कांहीं प्रमाद झालेले असल्यास ते आम्हांस कळविण्याची वाचकांनीं मेहेरबानी करावी. म्हणजे पुढच्या आवृत्तीचे वेळीं योग्य ते फेर- फार करूं. ह्या पुस्तकांत आम्ही पुढील चार शब्द नवीन घडवून योजले आहेत. "वाक्प्र- चार,” “शब्दसंहति,” “भाषेचा स्वभाव,” आणि “समस्वकल्प शब्द." आमच्या काव्यांचीं नांवें छांदिष्टपणाचीं, व काव्याच्या विषयाचा बोध करून न देणारी, असतात, असा महाराष्ट्रीयांचा आमचेवर आक्षेप आहे. हा आक्षेप अस्थानी नाहीं असें जरी गृद्दीत घेतलें, तरी निदान वरील चार शब्द घडविण्यांत आमचे हातून कांहीं छांदिष्टपणा न व्हावा अशी आम्हीं पूर्ण खबरदारी बाळगिली