Jump to content

पान:मराठी भाषेचे वाक्प्रचार, म्हणी, इत्यादि.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी भाषेचे वाक्प्रचार, म्हणी, इत्यादि. ग. त्याचे वर्तन मला अगदीं संमत नाहीं. घ. त्या बाबतीत तुला अगदीं कांहीं समजत नाहीं. ङ. त्याला बिलकूल अक्कल नाहीं. च. माझ्या कामांत तूं बिलकूल पडूं नको. ह्या सहा वाक्यांपैकी क आणि ख हीं करणरूपी वाक्यें असून बाकीचीं सारी अकरणरूपी आहेत, व तीं सहाही ग्राह्य आहेत. आतां पुढील वाक्यें पहा. छ. तूं बिलकूल गाढव आहेस. ज. तो बिलकूल शहाणा आहे. येथें हीं दोन्ही वाक्यें अग्राह्य आहेत. 'अगदी ' हा शब्द विकल्पेकरून कर- णरूपी व अकरणरूपी योजण्याची रूढीनें सवलत दिली आहे. परंतु 'बिलकूल' हा शब्द अकरणरूपीच योजला पाहिजे, अशी नियंत्रणा रूढीने लावून दिली आहे. ९. अमुक विचार व्यक्त करावयाचा असतां अमुक शब्दांच्या शेजारी अमुकच शब्द, अमुकच रूपानें, अमुकच क्रमानें आले पाहिजेत, ही जी भाषेची रूढि म्हणजे प्रचार, तिला आपण " वाक्प्रचार ही संज्ञा देऊ, आणि अशा रीतीचा जो शब्दांचा समुदाय, त्याला आपण " शब्दसंहति " असें म्हणू. १०. रूढि अमुक प्रकारची कां असावी, हें सांगणें जरी कठिण आहे, तरी रूठीच्या प्रकारांचें वर्गीकरण करणें कठिण नाही. या पुस्तकांत ह्या विषयाचे शास्त्रीय रीत्या सांगोपांग विवरण करावयाचे नसल्याकारणानें आम्ही येथें फक्त प्रसंग, साहचर्य, अनुक्रम, लक्षणा, साम्य, इत्यादिकांसंबंधानें रूढि कशी नियं- त्रणा लावून देते, हें आणखी कांहीं उदाहरणांनी स्पष्ट करून दाखवितों. ११. 'घबाड ' शब्द नाम असतां त्याच्या अर्थ 'लाभ' असा होतो; व तो शब्द विशेषणाप्रमाणे योजला असतां 'फार मोठा ' असा त्याचा अर्थ होतो. त्या अर्थाने तो फक्त मुहूर्त, माप, चुकी, दैव, आणि वशीला, त्या पांच शब्दांच्या मागे येऊं शकतो. घबाड मुहूर्त, घबाड माप, घबाड चुकी, घबाड दैव, आणि घबाड वशीला, असे प्रयोग प्राय म्हणून गणले आहेत. परंतु घबाड पेटी, घबाड शरीर, घबाड अंमलदार, घबाड दिवस, वगैरेसारखे प्रयोग हास्यास्पद होतील. १२. वाक्प्रचारोंन ज्या शब्दसंहति ठरून गेल्या आहेत, त्या तशाच योजाव्या