पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुभानंद: ओव्या . सत्यापाशी तिष्ठती हरिहर । सत्य तरिजे भवसमुद्र । सत्ये चाले हे चराचर । सत्यें भूतें पृथ्वी वाहे ॥ १४ ॥ सत्यें वर्षे हे जीवन । सत्य यज्ञ करी पचन । सत्यें विचरें महापावन । सत्यें आकाश हे उभे ॥१५॥ सत्यापरता नाहीं देवो । सत्याविणे स्वर्ग वावो । सत्यापाशी वासुदेवो । सेवा करी निजांगें ॥१६॥ शिबि श्रियाळ हरिश्चंद्र नृपती । यांची पुराणी वर्णिली कीर्ति । सत्य रक्षोनियां मुक्ति । निज सामर्थ्ये पावले ॥ १७ ॥ सत्यं वर्ततां तो अनंत । सर्वथा नुपेक्षी कमळाकांत । हिरण्यकश्यपें मारितां प्रहाद भक्त । लीलाविग्रहें रक्षिला ॥१८॥ दैत्य मारूं जातां सुता । मृत्यु आला दैत्यनाथा । सुग्रीवातें मारूं जातां । वाळी प्राणे निमाला ॥ १९ ॥ चरणी हाणितां रावण । झाला चिरंजीवी बिभीषण । सत्यवंताते नारायण । पदोपदी रक्षित ॥ २० ॥ सत्य स्वधर्म रक्षण । प्राणी परपार पाविजे पंथें तेणें । संजया ! भूतसृष्टि एके एणे । सत्यापासोनि चालतसे ॥२१॥ सत्यें उभं स्तंभाविण गगन । सत्यापसाव वावरे पवन ॥ होतसे रात्रिदिन । सत्यापासोनि संजया ॥ २२ ॥ सत्यापासोनि हिंडे सविता । चंद्रे औषधीसी अमृतता ॥ सत्यापासोनि दाहकता । अग्निकर्म हे चाले ॥ २३ ॥ सत्यापासोनि सर्वभार । पृथ्वी वाहे हे सचराचर ॥ सत्यापासोनि जलधर । मेघमाळा मोकळी ॥ २४ ॥ सत्याचेंचि समर्थ बळ । सत्य रक्षोनि झाले देव सकळ । प्राप्त झाली पदें अढळ । सत्यापासोनि संजया ॥ २५ ॥ शीतोष्ण सुखदु:ख साहोन । सत्यकरोनि विषयवारण । सत्येंकरोनि इंद्रिये बंधन । सत्यें ब्रह्मा पाविजे ॥ २६ ॥ सत्येकरूनि अंतराळी । भ्रमती नक्षत्रे महामाळी ॥ रुद्रादित्य वसु मंडळी । विश्व देवादिक हे ॥ २७ ॥ OF HISHTE RESUP0105_उद्योगपर्व, D iwalimoनांक 195ोज