पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या गुणधर्मासह कवितेत त्या निसर्ग प्रतिमा प्रवेश करतात तेव्हा त्यामुळे नकळत एक अनोखा सुंदर अर्थ कवितेला प्राप्त होतो. $3 'आकाश निळे तो हरी अन् एक चांदणी राधा बावरी युगानुयुगीची मनबाधा निळ्या अथांग अन् विशाल आकाशावर भाळलेली, त्याच्या गूढ विस्तीर्ण दर्शनाने विस्मित झालेली एक सुंदर नाजूक अन् लुकलुकणारी चांदणी. एवढ्या विशाल अन् निळ्याशार रूपावर ती चांदणी भाळली नाही तरच नवल. पण त्याचबरोबर त्याच्या गूढ अंतरंगाला पाहून ती अगदी बावरून गेली. तिला काही सुचेनासं झालं आहे. हे असं होणं खरोखरीच स्वाभाविक आहे. कारण लुब्ध होणे ही प्रेमाची पहिली पायरी आहे. प्रथमदर्शनीच लुब्ध व्हावं पण प्रियकराच्या अंतरंगाचा ठाव न लागल्यामुळे बावरून जावं ही युगानुयुगाची प्रेयसीच्या मनाची झालेली ' मनबाधा' च नाही का ! $4 विस्तीर्ण भुई गोविंद अन् क्षेत्र साळीचे राधा स्वच्छंद युगानुयुगाची प्रियवंदा हीच बावरलेली राधा पुढे स्वच्छंद अन् मनमोकळी झालेली आहे. तिचे बावरलेपण नाहीसे झाले आहे कारण आता ती भुईरूप कृष्णाच्या स्पर्शाने मोहोरलेली, पुलकित झालेली आहे. साळीच्या क्षेत्राच्या रूपात ती भुईरूप कृष्णाच्या वक्षावर आनंदाने प्रेमभराने ६६