पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आस्वाद-लेखन आस्वाद-लेखन करताना कवी, लेखक वा दिलेला उतारा यांच्याशी संलग्न अशा वाङमयीन वा काल्पनिक गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. त्या उतान्याशी संलग्न वा संबद्ध आठवण, प्रसंगवर्णन करायला हरकत नाही. तत्संबंधी एखाद्या मान्यवराच्या विचारांचे सूत्र वा उद्गारही ज्ञात असल्यास नोंदवायला हरकत नाही. यानंतर उतान्यातील विषयाचा, आशयाचा चिकित्सकपणे विचार केला पाहिजे. त्यात तार्किकता व शास्त्रीयता असली पाहिजे. आस्वाद लेखन करताना अन्य रसिकांना गृहीत धरूनच ते केले पाहिजे. म्हणजे आस्वादाचे आवाहन सर्वाप्रत अधिक पोहोचू शकेल. प्रारंभी आस्वाद लेखन करतांना दिलेल्या गद्य वा पद्य उता-याकडे रसिकाचे चित्त वेधता आले पाहिजे. शिवाय रसा- स्वादाला अनुकूल अशी मनःस्थिती निर्माण केला पाहिजे. नाट्यारंभी रसिक मायबाप हो !' असे संबोधन असते तर वक्ताही श्रोत्यांना अवधान देण्याची विनवणी करीत असतो. भ्रमर जैसे परागु नेती ' इतक्या हळवारपणे आणि सुकुमार अंतःकरणाने रसिकांनी काव्याकडे पाहावे असे ज्ञानेश्वर सांगतात. 'शारदियेचे चंद्रकळे । माजी अमृतकण कोवळे | ते वैचति मने मवाळे | चकोर तलगे | ही भाववृत्ती रसिकाने अंगी बाणवल्यावर लेखक, आणि आस्वादक, कलावंत आणि कलारसिक यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होऊ शकतो. उताऱ्याचे मर्म कळू शकते आणि त्यातील सौंदर्यस्थळांचे रहस्यही जाणकारपणे समजून घेता येईल. दिलेल्या उतान्याशी आपण मनःपूर्वक तादात्म्य झालो म्हणजे लेखकाचे मन १८ ५९